“छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती” ; “शिवजयंती” महोत्सवात आमदार “विजय वडेट्टीवार” यांचे प्रतिपादन.
1 min readगडचिरोली: (प्रतिनिधी); १९ फेब्रुवारी: हिंदवी स्वराज्याची निर्मीती करतांना छञपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातिल लोकांना सोबत घेवुन रयतेच्या हिताचे रक्षण केले शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती असे प्रतिपादन माजी कैबिनेट मंञी तथा ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे दि १७ ते २० फरवरी या कालावधित नवतरुण युवक मंडळाच्या वतिने बळीराजा चौकातिल सुभाष वार्डात शिव जयंती महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवचरित्र प्रबोधनकार कांचनताई शेळके यांच्या शिवकिर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की देशात मोघलांनी सत्ता काबिज केल्यानंतर जुलमी राजसत्ता अस्तित्वात आली या सत्तेत सर्वसामान्य जनतेवर अनेक कर आखुन मोघलांनी लुट मचवली होती. मोघलांवेतिरिक्त इतर धर्मियांना अपमानजनक वागणुक दिली जात होती. आपल्या मातीत इतरांनी राज्य करणे हे जिजाऊंना मान्य न्हवते यासाठी स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जिजाऊंनी लहानवयातच शिवरायांवर स्वराज्य निर्मितिचे संस्कार रुजविले. स्वराज्याचा लढा उभारतांना शिवरायांनी जातिभेद व धर्मभेद ही संकल्पना स्पष्टपणे नाकारली. आपल्या सैन्यात सर्व जातिधर्मातिल मावळ्यांसह मुस्लिमांनाही मानाचे स्थान देवुन छञपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष पद्धतिने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अनेक संकटांना तोंड देवुन स्वराज्याचे रक्षण करतांना राजेंनी स्वकिय व परकिय असा भेदभाव केला नाही. हिंदवी स्वराज्याच्या राजसत्तेत कधी मश्जिदी पाडुन मंदिरांची निर्मीती केली नाही. स्त्रीयांचा अपमान सहन केला नाही. परस्त्रीला आई व बहिनीप्रमाणे वागणू दिली. शिवाजी महाराजांचा राज्य कारभार आदर्श तत्वप्रणाली बाळगणारा होता. जगाच्या इतिहासात जनकल्याणकारी राजा म्हनुण शिवरायांची ओळख आहे. पुरोगामी विचारसरणी जोपासणार्या महाराष्ट्रात राज्यकर्ते केवळ शिवरायांच्या नावाचा उल्लेख करतात मात्र शिवरायांना अपेक्षित असलेला राज्यकारभार करत नाही. प्रतिगामी विचारसरणी बाळगणारे सत्ताधारी सर्वसामान्य जनतेची आर्थिक लुट करतांना दिसतात. जातिधर्माचे राजकारण करुण सामाजिक तेढ निर्माण करतांना दिसतात. असे राज्य शिवरायांना अपेक्षित होते काय? असा सवालही या प्रसंगी वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शिवरायांचे सुराज्य निर्माण करण्यासाठी दांभिक सत्तेचे मनसुबे हानुण पाडा असे आवाहनही या प्रसंगी वडेट्टीवारांनी केले. या कार्यक्रमाला माजी आम डॉ नामदेवराव उसेंडी, डॉ नामदेव किरसान, वामनराव सावसाकडे, परसराम टिकले , राजुभाऊ रासेकर, नितिन राऊत , मनोज ढोरे , नानाजी तुपट , हरिष मोटवानी , राजु बुल्ले , दिगांबर मेश्राम, प्रशाला गेडाम, संदिप वाघाडे, अरुण कुंभलवार, यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आयोजन प्रमुख मनोज ढोरे यांचा वडेट्टीवार यांचे हस्ते शाल श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्ध्यार्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदिप उरकुडे, गणेश भोयर, संदिप प्रधान, पियुष उरकुडे, अनिल चिंचोळकर , आदित्य मिसार यांचेसह नवतरुण युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले ।