December 23, 2024

“१० दिवस मृत्यूची झुंज देत अखेर त्या मनमिळावू प्रा. लीलारेची प्राणज्योत मावळली”

1 min read

“मागील बारा वर्षापासून कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांना देत होते धडे.”

 

 “कुरखेडा वडसा मार्गावर १० फेब्रुवारीला विद्याभारती महाविद्यालयाजवळ जवळ झाला होता भीषण अपघात.”

“अज्ञात चार चाकी वाहनाने दुचाकी चालकाला धडक देऊन झाला होता फरार.”

कुरखेडा;(प्रतिनिधी); १९ फेब्रुवारी:

10 फेब्रुवारी रोज शुक्रवारला सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुरखेडा वडसा मार्गावर विद्याभारती महाविद्यालय जवळ दुचाकी चालक प्रा. भूमेश्र्वर लिल्लारे यांना अज्ञात चारचाकी वाहनानी धडक देवून वाहन चालक घटनास्थळावरून एकही मिनिट न थांबता पसार झाला होता.

प्रा. भुमेशवर योगेश्वर लीलारे ( ३९ ) सरांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होत ते धारातीर्थ पडले.

प्राप्त माहितीनुसार भुमेश्वर लीलारे चिखली वरून कुरखेडा कडे दुचाकी ने येत असताना विद्याभारती महाविद्यालय जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर कोसळले होते.घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.

मार्गक्रम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना उचलून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची हिंमत दाखवली नाही. कुरखेडा येथील विद्यार्थीनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर घटनेची माहिती मिळतात त्यांनी एका खाजगी वाहनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी कोणीही समोर येत नव्हता पण मोबाईलवर सदर घटनेची चित्रीकरण करण्यासाठी सगळे आतुर असल्याचे घटनास्थळी पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच लगेच कुरखेडा जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमीला रुग्णवाहिकेतून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहचवत त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना सर्वोदय हॉस्पिटल ब्रमपुरी येथे भरती करण्यात आले व नंतर सुद्धा सिटीस्कॅन व रक्तचडवून गंभीर स्थितीमध्ये नागपूर येथील न्यूरान हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. प्राध्यापक भूमेश्वर लिलारे सर हे मागील दहा दिवसापासून न्यूरान हॉस्पिटल नागपूर येथे मृत्यूची झुंज देत होते अखेर आज त्यांची सकाळी सात वाजता प्राणज्योत मावळली.

प्रा.भूमेश्वर लिल्हरे हे येथील श्रीराम कनिष्ठ तथा वरीष्ठ महाविद्यालय कुरखेडा तथा गो. ना मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे इंग्लिश विषययाचे प्राध्यापक म्हणून मानधन तत्वावर कार्यरत होते. मागील बारा वर्षापासून ते इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांना धडे देत होते. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मनमिळावू आणि हसमुख स्वभाव असलेल्या भुमेश्वर उर्फ गुडा सोबत ही दुर्दैवी घटना घडून तबल दहादिवसाने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोबतच एक उत्कृष्ट इंग्रजी विषयाचा प्राध्यापक गमावल्याने संस्थाचालक , प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व चिखली ग्रामवासीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांना आई व एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. च्या पार्थिव शरीरावर चिखली येते आज सहा वाजता अंतीम संस्कार करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!