“अंगावर भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या रमेश ने उपचारादरम्यान नागपूर येथे घेतला अखेरचा श्वास”
1 min read“जुन्या इमारतीचे तोडफोड करत असताना अंगावर भिंत पडून येथील रमेश महागु तुलावी भिंंतीखाली दबून गंभीर जखमी झाला होता.
कुरखेडा; (प्रतिनिधी); १९ फेब्रुवारी:
कुरखेडा येथील आंबेडकर चौकात वास्तव्य असणाऱ्या मारुती टेंभुर्णी यांच्या जुन्या घराची मोडतोड करीत असलेल्या रमेश तुलावीच्या अंगावर अचानक भिंत कोसळल्याने तो भिंतीखाली दबला गेला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती.
गंभीर जखमी झालेल्या रमेश तुलाविला तात्काळ हात गाडीच्या साह्याने उपस्थित नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा सल्ला देण्यात आला होता.अंगावर भिंत पडल्याने रमेश चा डावा पाय हात व डोक्याला जबर जखम झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले होते.
दुखापत अत्यंत गंभीर असल्या करणांने त्याला गडचिरोली वरून नागपूर मेडिकल मध्ये दाखल केले होते. कमरेचे व पायाची यशस्वी शात्रक्रिये नंतर पोटातील शस्त्रक्रिया करणे करिता तयारी सुरू असताना अचानक रमेशची तब्येत खालावली. रक्तदाब अत्याधिक वाढल्याने पोटाची शात्रक्रिया रद्द झाली होती.
रमेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने कुरखेडा येथील समाज बांधवांकडून उपचाराकरिता वर्गणी गोळा करून नागपूरला पाठविण्यात आली होती.
मागील दोन दिवसात रमेश उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टर ही निराश झाले होते. शेवटी आज दुपारी त्याची प्राणज्योत मावळली.
रमेश तुलावीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून हातमजुरी करून रमेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या करता पुरुष होता. त्याच्या मागे पत्नी, आई व दोन मुलं आहेत. मुलं लहान आहेत व आई वृध्द असल्याने आता कुटुंबाची जबाबदारी रमेशच्या पत्नी खांद्यावर येवून ठेपली आहे.