December 23, 2024

“आपत्तीमित्रांवर अरत्तोंडी येथे विपदा”; हाणामारीत जखमीला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे केले दाखल “

1 min read

“आपत्तीमित्रांना बेदम मारहाण. आपत्ती मित्र नैतिक मेश्राम, २० वर्ष याला जखमी अवस्थेत कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”

गडचिरोली; (प्रतिनिधी); २० फेब्रुवारी: कुरखेडा तालुक्यातील अरत्तोंडी येथील जत्रेत आपदा प्रबंधन करिता तैनात असलेल्या आपदा मित्रांवर २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० दरम्यान यात्रेतील काही युवकांनी हल्ला करत जखमी केले आहे.
प्राप्त माहितीनुसार काही युवकांनी यात्रेकरू सोबत वाद करत तुफान राडा करत होते. रस्त्यावर गर्दी झाल्याचे पाहून काही आपत्ती जनक परिस्थिती असल्याचे समजून सर्व आपदांमित्रानी गर्दीच्या दिशेने धाव घेतला. येथे भांडण सुरू असल्याचे लक्षात येता, कर्तव्य बजावत असलेल्या १० आपत्ती मित्रांनी येथील गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्या युवकांनी या आपदा मित्रांनाच मारझोड सुरू केली. या हाणामारीत जखमी झालेल्या कोरेगाव येथील आपत्तीमित्र नैतिक मेश्राम, २० वर्ष याला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. या हाणामारीत ६ आपदा मित्रांना किरकोळ मार लागलेला आहे. मारझोड करणारे युवक अरत्तोंडी येथील स्थानिकच असल्याचे समजल्याने इतर ९ आपदामित्रांनी सुरक्षेच्या दृष्टीने अरत्तोंडी येथील बेस कॅम्प सोडून कुरखेडा येथील पोलिस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला.

कुरखेडा पोलिस स्टेशन येथे सुरक्षेच्या दृष्टीने पोहोचलेले आपदामित्र.

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केलेल्या नैतिक मेश्राम यांच्या बायानावरून ३ ते ४ अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत प्रभारी ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे हे करीत होते.
यावर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील आपत्तीजनक परिस्थितीमध्ये स्थिती वेळेवर नियंत्रित करण्याचा प्रशिक्षण देवून ३०० सुशिक्षित बेरोजगार युवकांना जिल्हा प्रशासनाने आपदामित्र म्हणून सोबत घेतले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून निवडलेल्या या युवकांना गडचिरोली येथे १२ दिवसाचे निवासी प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते. स्वयंसेवक म्हणून सेवा देत असताना या प्रकारे हल्ला होणे चिंताजनक बाब आहे. सदर प्रकरणात दोषींवर कायदेशीर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे.

आपदामित्रांचे कुरखेडा पोलिस स्टेशन येथे जमा केले साहित्य.

About The Author

error: Content is protected !!