“महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या; प्रकरण दडपण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना सूचनापत्र पाठवलेच नाही”; परस्पर शव परिवाराच्या सुपूर्द केले.
1 min read“येथील वैद्यकिया अधिकारी डॉ. धूनेश्वर खुणे राजकीय दबावात काम करत असल्याचे या प्रकरणानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. या पूर्वीही या वैद्यकीय अधिकाऱ्याने २५ सप्टेंबर २०२२ ला आपल्या एका नातेवाईकाला येथील एका पत्रकारावर गुन्हा नोंद करण्याकरिता मदत व्हावी म्हणून खोटी वैद्यकीय रिपोर्ट तयार करून गंभीर दुखापत झाल्याचं देखावा केला होता सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे न्यायप्रविष्ट आहे.”
कुरखेडा; नसीर हाशमी (प्रतिनिधी); २१ फेब्रुवारी:
उपजिल्हा रुग्णालय कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना सूचनाच दिली नाही. परस्पर शव परिवाराच्या ताब्यात दिले व अंतिम विधी आटोपल्या नंतर पोलिसांना सूचना मिळाल्याने ते येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले असता. कर्तव्यावर असलेले डॉ. भूनेश्वर खुणे यांना सदर घटनेची माहिती देण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक यांनी बोलावणे केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्राप्त माहितीनुसार येथील गांधी वार्ड निवासी विद्याबई हेमंत दाहिकर ६० वर्ष या महीलेने ११.३०.चे दरम्यान शास्त्री चौक येथील सार्वजनिक विहरित आत्महत्या करण्याचे उद्देशाने उडी घेतली. घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी तिला वाचविण्या करिता विहिरीत दोरी बाल्टि टाकून वाचविण्याचा प्रयास केला. परंतु विहिरीत उडी घेतलेल्या महीले कडून सहकार्य मिळत नव्हते, ती दोरी पकडत न्हवती. अशी माहिती येथील प्रत्यक्षदर्शींनी सदर प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली. दूरध्वनी द्वारे घटनेची सुचना तिच्या मुलांना दिली असता ते तात्काळ घटना स्थळी दाखल झाले. डोळ्या समोर जन्मदात्री आई विहिरीत बुडत असल्याचे पाहून, पोहताही न येणाऱ्या मुलाने आईला वाचविन्या करिता थेट विहिरीत उडी घेतली. सुदैवाने तो दोरी पकडुन राहिल्याने उडी घेतलेल्या महिलेला विहिरीतून बाहेर करण्यात आले. दुपारी १२.०५ च्या दरम्यान सदर महिलेला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान महिला मृत झाल्याचे डॉ. भूनेश्वर घनश्याम खुणे यांनी तपासून शाहनिशा केली व रुग्णालयात महिला मृत स्थितीत आणल्याची नोंद घेतली. येथील कर्तव्यावर असलेल्या प्रवीण पांडे नामक परीचारकने एम एल सी बुक मध्ये अ. क्र. ४२ व ७७ क्रमांक वर नोंद घेत पोलिसांना सूचना करण्याचा प्रयत्न केला असता डॉ. खुणे यांनी सदर वाही मधील नोंद खोडून पोलिसांना सूचना करण्यापासून सदर परीचारकास रोखले अशी विश्वसनीय माहिती आहे.
शवाची परिस्थिती पाहता व महिलेचे आत्महत्या असल्याने सदर घटनेची सूचना पोलिसांना देणे अनिवार्य होते. परंतु डॉ. खुणे यांनी येथील काही राजकीय पुढाऱ्यांच्या बोलण्या वरून परस्पर शव परिवाराच्या सुपूर्द केले. शवविच्छेदन करिता मृतकाचा परिवार तयार नाही असे दप्तरी नोंद करून सदर महिलेचे शव परस्पर सुपूर्द केल्याने येथे कार्यरत वैद्यकिय अधिकारी डॉ. खुणे परत एका नवीन वादात सापडले आहेत.
वैद्यकिय अधिकारी डॉ. धूनेश्वर खुणे राजकीय दबावात काम करत असल्याचे या प्रकरणानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. या पूर्वीही २५ सप्टेंबर २०२२ ला आपल्या एका नातेवाईकाला येथील एका पत्रकारावर गुन्हा नोंद करण्याकरिता मदत व्हावी म्हणून खोटी वैद्यकीय रिपोर्ट तयार करून गंभीर दुखापत झाल्याचं देखावा केला होता सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे न्यायप्रविष्ट आहे.”
सदर घटनेची माहिती घेण्या करिता येथील पोलिस स्टेशन येथे माध्यम प्रतिनिधींनी संपर्क केला असता असली कुठलीच नोंद झाली नसल्याचे प्रभारी ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी सांगितल्याने असता उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके यांना विचारणा केली त्यांनी सदर प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या डॉ. खुणे यांचे कडून सदर प्रकरणात कसूर केल्याचे विषयाला दुजोरा दिला आहे.
महिला आत्महत्या सारख्या संवेदन विषयात हेतुपरस्पर माहिती लपविण्याचा कसूर करणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोणती कार्यवाही आरोग्य प्रशासन करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.