“आज विदर्भ निर्माण यात्रेचा कुरखेडा शहरात आगमन; गांधी चौकात होणार सभा”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); २६ फेब्रुवारी: वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र करण्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ निर्माण यात्रा सुरू केली आहे. आज २६ फेब्रुवारीला ही यात्रा कुरखेडा येथे पोहोचणार असून येथील गांधी चौकात सभेचे आयोजन केलेले आहे.
1 फेब्रुवारी २०२३ पासून कालेश्वर वरून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निघालेली विदर्भ निर्माण यात्रा मार्ग क्रमन करीत गडचिरोली – सावली – मुल – चंद्रपूर – बल्हारशाह – राजुरा – कोरपना – वणी – चिमूर – भिसी – नागभिड – ब्रम्हपुरी वडसा मार्गे 26 फरवरी ला सायंकाळी 05 वाजता कुरखेडा शहरात दाखल होणार आहे . व सायंकाळी 06 वाजता गांधी चौक कुरखेडा येथे विदर्भ निर्माण यात्रेचे भव्य सभेत रूपांतर होणार आहे . या विदर्भ निर्माण यात्रेत पूर्व विदर्भ प्रमुख श्री. अरूण जी केदार , माजी मंत्री डॉ.रमेश जी गजबे युवा आघाडी विदर्भ प्रमुख मुकेश जी मासुरकर , कोर कमिटी सदस्य तात्या साहेब मते , सुदाम जी राठोड , सुधाताई पावडे , ज्योतीताई खांडेकर असून ते विदर्भ राज्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत .
या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरता परिसरातील विदर्भप्रेमी महिला-पुरुष शेतकरी, शेतमजूर , व्यापारी , उद्योजक , सुशिक्षित बेरोजगार युवक – युवती बहुसंख्येने उपस्थित राहावे . असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा प्रमुख राजेंद्रसिंह ठाकूर व विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कुरखेडा कार्यकर्त्यांनी केली आहे.