देऊळबोडी येथे स्वच्छता अभियान राबवित “स्वच्छ जल”, “स्वच्छ मन” अभियानाचा श्रीगणेश
1 min readकूरखेडा; (प्रतिनिधी); २६ फेब्रुवारी: संत निरंकारी मिशन शाखा कूरखेडा व मालेवाडा यांचा वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमीत्य देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट अमृत “स्वच्छ जल”, “स्वच्छ मन” अंतर्गत निरंकारी सेवादलाचा स्वंयसेवकांद्वारे आज रविवार रोजी सकाळी ८ ते दूपारी १२ या कालावधीत श्रमदान करीत येथील देऊळबोडीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संत निरंकारी मंडळाद्वारे सद्गुरु माता सूदिक्षाजी महाराज यांचा मार्गदर्शनात देशातील २७ राज्यातील ७३० शहरात हा जल संरक्षण व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील देऊळबोडी जलस्त्रोतात स्वच्छता अभियान राबवित परीसरातील स्वच्छता करण्यात आली व येथील जलसाठा प्रदूषित होणार नाही याकरीता अभियाना द्वारे व प्रचार पत्रकाद्वारे संदेश देण्यात आला.
अभियानाचे उदघाटन मुनघाटे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कीशोर खोपे यांचा हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ दशरथ आदे होते तर प्रमूख अतिथी म्हणून निरंकारी मंडळाचे कूरखेडा शाखा प्रमूख माधवदास निरंकारी नगरसेवक तथा भाजपा तालुका महामंत्री एड. उमेश वालदे, डॉ जगदीश बोरकर, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, प्रा. डॉ नरेन्द्र आरेकर, उल्हास महाजन, आरोग्य सभापति अतूल झोळे , भाजयुमो चे तालुका महामंत्री उल्हास देशमुख, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिराज पठान, तालुका सहसचिव पत्रकार विनोद नागपूरकर , मधूकर निनावे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे मालेवाडा शाखा प्रमूख क्रीष्णाजी किंचक तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यानी केले. अभियानाचा यशस्वीतेकरीता मंडळाचे सेवादल प्रमूख दिलीप निरंकारी, अजय पूस्तोडे, कार्तिक धकाते व सेवादलाच्या सर्व स्वंयसेवकानी प्रयत्न केले.