“अवैध दारू विक्री करतांना शिक्षकांसोबत दोन व्यक्ती आढळले, मालकांना सोडून नोकरावर गुन्हा दाखल”
1 min read“बेडगांव पोलीसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर शंका?” “मुक्तीपथ संयोजिकेने शिक्षकासोबत पकडुन दिलेल्या अवैध दारू विक्री प्रकरणात मोक्यावर विक्री करताना सापडलेल्या दोन व्यक्तींना आरोपीच केले नाही. सदर धाड टाकल्या नंतर मुक्ती पथ संयोजिका श्रीमती निळा किलनाके यांनी मोक्यावरून त्यावेळी पकडलेल्या आरोपी व मुद्देमालासह तिघांचेही फोटो काढून प्रसार माध्यमांकडे पाठविले होते. मात्र बेडगाव पोलीस मदत केंद्रात दाखल झालेल्या गुन्ह्यात दोघांना सोडून दिल्याने पोलीसांच्या एकुणच कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित केल्या जात आहे”.
कोरची;नंदू वैरागडे(प्रतिनिधी);२६फेब्रुवारी: कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर मोहगाव गावा जवळ एस एस हॉटेल व रेस्टॉरंट येथे धाड टाकून मुक्ती पथ संयोजिकेने एका शिक्षकासह दोघांना रंगेहाथ अवैध दारू विक्री करित असतांना पकडून दिले. मात्र बेडगाव पोलीसांनी मोक्यवर मिळून आलेल्या एका शिक्षक व एका अशा दोघांना सोडून केवळ हॉटेलच्या नोकरावरच गुन्हा दाखल केल्याने पोलीसांच्या एकुणच कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24/02/2023 रोजी नामे मिलिंद ताराचंद सहारे हा कोरची पुराडा रोडवरील हॉटेल मध्ये दारूची अवैधरित्या विक्री करीतअसल्याची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्याने सदर हॉटेल वर धाड टाकली असता त्या ठिकाणी असलेल्या किचन मध्ये लाला काळ्या रंगाच्या कॉलेज बॅग मध्ये आय बी 180 मिली 9 बोटल,रॉयल स्टेग 180 मिली 3 बोटल असा एकूण 2400 रुपयांच्या विदेशी मुद्देमाल जप्त करन्यात आला मनुन पोलिक स्टेशन कोरची येथे अप.क्र 15/2023 मदाका 65 इ अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हा तपासावर असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व या प्रकरणात आरोपी केलेल्या मिलिंद ताराचंद सहारे हा एस एस हॉटेल मध्ये मजुर म्हणुन काम करतो तो आचारी आहे मूळ मालक नाही. सादर हॉटेल हे शुशील अडकिने या शिक्षकांच्या मालकीचे असुन शंकर पटले नावाचे दुसरे व्यक्ती यांचे पार्टनर आहेत अशी माहिती आहे. सदर शिक्षक जि. प. प्रा. शाळा बिहीटेखुर्द येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
जप्त करण्यात आलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात मिलिंद सहारे वर फक्त गुन्हा दाखल केला आहे व उपरोक्त दोन आरोपींना सोडून दिल्याचे सांगितले जात आहे.
मुक्ती पथ संयोजिका श्रीमती निळा किलनाके यांनी अवैध दारू विक्री पकडू दिली. त्यावेळी पकडलेल्या मुद्देमालासह तिघांचेही फोटो काढून प्रसार माध्यमांकडे दिलेला होता मात्र बेडगाव पोलीस मदत केंद्रात केवळ नोकरावर गुन्हा दाखल करुन इतर दोघांना सोडून दिल्याने पोलीसांच्या एकुणच कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित केल्या जात आहे.
या पूर्वीही कोरची पोलीस स्टेशन समोर 300 मीटर अंतरावर वाय के धाबा मालक शंकर पटले रा. देवरी हा चालवीत होत. तीथे अवैध दारू खुलेआम सुरू ठेवले असल्याने त्यावर कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . अवैध दारू विक्री होत असल्याने कोरची पोलीसांनी धाबा बंद करण्याचे सांगितले होते. सदर ढाबा बंद करून कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर मोहगाव जवळ एस एस हॉटेल व रेस्टॉरेंट मध्ये शिक्षक सुशील अडकने याला पार्टनर करून ह्या दोन्ही लोकांनी अवैध दारु विक्रीचा धंदा सुरू केला होता. याबाबत माहिती मिळाली असता येथील मुक्तिपथ संयोजिका श्रीमती निळा किलनाके यांनी बेडगांव पोलीसांना तिघांना अवैध दारू विक्री व्यवसाय करताना पकडून दिले. मात्र, पोलिसांनी केवळ नोकरावर गुन्हा दाखल करुन इतर दोन मुख्य आरोपीयांना परस्पर सोडून पोलीसांनी नोकरावर गुन्हा दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या शंकेला चांगलाच वाव मिळत आहे.
“या प्रकरणात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने पोलिस मदत केंद्र बेडगांव येथील प्रभारी पोलीस अधिकारी अनिल नानहेकर यांना संपर्क केला असता त्यांनी तपास सुरू आहे, मुक्तीपथ संयोजिका यांना बयाना देण्यासाठी बोलावले, परंतु त्या बयाण न दिल्याने इतरांवर गुन्हा दाखल केला नाही असे सांगितले.”