January 11, 2025

शेती पंपांना १६ तास विद्युत पुरवठा द्या अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा “आप” चा इशारा

1 min read

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कुरखेडा मार्फत निवेदन पाठवून ८ दिवसात मागणी पूर्ण करण्याची विनंती, मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.”

कुरखेडा, (प्रतिनिधी); २७ फेब्रुवारी; शेती पंप करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून 16 तास करावे अन्यथा येत्या आठ दिवसांत आम् आदमी पार्टी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांना , ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील तहसीलदार यांचे मार्फत निवेदन सादर करून दिलेला आहे. कुरखेडा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार चौगुले यांनी आप च्या शिष्ट मंडळाकडून निवेदन स्वीकारले.
कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे. यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या परिस्थितीवर आहे. सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल. यापूर्वी 12 तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले, परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तत्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी पीक हातातून निघून जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.
सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेती करिता १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यावर होणाऱ्या या अन्याय विरोधात

आम आदमी पार्टीने शेतकरी हितार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आप ने दिलेला आहे. पुढील ८ दिवसात आपची मागणी मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा निवेदनात म्हटल आहे.


निवेदन सादर करतांना तालुका संयोजक ईश्वर ठाकूर , तालुका सचिव ताहीर शेख, तालुका सह संयोजक अनिकेत आकरे, दीपक धारगाये, पंकज डोंगरे, जिल्हा युवा कार्यकारिणी सदस्य हिरा चौधरी, युवा तालुका सचिव साहिल साहरे, मीडिया प्रमुख शहेजाद हाशमी, युवा सह सचिव अतुल सिन्द्रम, सतीश कावडकार, निलेश बसोना, कुमार नवघडे, राकेश जांबंधू , चेतन मैंद, इमरान पठान आदी आप कार्यकर्ता उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!