“कॉपी व्हायरल व्हिडियो प्रकरणात आज परीक्षा सुरू असतानाच केंद्र प्रमुख बदलले; शिक्षण विभागाची तडकाफडकी कार्यवाही”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); ८ मार्च: कुरखेडा येथील परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख असलेले शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर कोल्हे यांचे कॉपी करिता पैसे घेतांना व्हायरल झालेले व्हिडिओ ची गंभीरता लक्ष्यात घेता आज येथील गट शिक्षणाधिकारी चंद्रकुमार पुराणिक यांनी तडकाफडकी कार्यवाही करत परीक्षा सुरू असतांनाच केंद्र प्रमुख पदावरून कार्यमुक्त करत येथीलच दुसरे प्राध्यापक राऊत यांचे कडे केंद्र प्रमुखाचे कार्यभार सोपविली आहे.
कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी कक्षेचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा प्रमुख असलेल्या यांनी केंद्रात कॉपी करू देणे करिता मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केल्याची बाब समोर आली होती.
एकीकडे प्रशासन कॉपीमुक्त परीक्षा घेण्या करिता परीक्षा केंद्र परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून बाहेरून कुणालाही परीक्षा केंद्रात कॉपी पुरवू देत नाही आहे. त्यातच आता परीक्षा केंद्र प्रमुख या बाबीचा फायदा घेत कॉपी करायची सुट पाहिजे असल्यास पैसे मोजावे असे म्हणत कित्येक परिक्षर्धी कडून पैसे घेतले होते.
येथील काही परीक्षार्थींनी सदर केंद प्रमुखास पैसे देत चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती. ही बाब लक्षात येताच सदर परीक्षा केंद्र प्रमुख येथील राजकीय पुढाऱ्यांच्या शरणी गेला होता. प्रकरण दडपण्यासाठी सदर विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना सदर व्हिडिओ मोबाईल मधून डिलीट करण्यास जबरदस्ती करून व्हिडिओ डिलीट करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता.
सदर व्हिडिओ गडचिरोली न्यूज नेटवर्क च्या हाती लागल्याने या प्रकरणाला वाच्यता फुटली आहे. सदर व्हायरल व्हिडिओ मध्ये येथील परीक्षा केंद्र प्रमुख विद्यार्थ्यांकडून ५०० – ५०० च्या नोटा रोख रक्कम स्वीकारून त्यांची रोल नंबर लिहितांना दिसत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे चित्र होते.
सदर शाळेतील प्राध्यापक येथे केंद्र प्रमुख बनून कॉपी पुरविणे करिता विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याची चर्चा होती. सदर कामा करिता येथे पाणी वाटप करिता काही लोकांना नियुक्त केले जाते. तेच लोकं सदर कॉपी करणे करिता केंद्र प्रमुख सोबत बोलणी करून पैसे सरळ केंद्र प्रमुखाच्या हाती देण्याचा काम करतात. थेट परीक्षा केंद्र प्रमुख पैसे व्यवहार केल्याने विडीर्थ्यांचा पक्का विश्वास बसतो. पण या वर्षी त्या पाणी वाटप करणाऱ्या व कॉपी पुरविण्याच्या कामात असलेल्या लोकांना परीक्षा केंद्रावर पाणी वाटप करीत न ठेवल्याने त्या पैकी एकानेच सादर बोलणी करवून व्हिडिओ बनविण्याचे काम केले असल्याचे बोलले जात आहे.