October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“लेंडारी जवळ चार चाकीचा भीषण अपघात; अनियंत्रित वाहन पुलियावरून खाली कोसळले; दोन जखमी”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १० मार्च: तालुक्यातील लेंडारी गावानजीक अनियंत्रित चारचाकी पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
सदर घटनेत सरफराज खालिद शेख वय २४ रा. शिरपुर याला किरकोड मार लागला असुन
प्रणय पुरुषोत्तम उईके वय २२ रा. गांगोली हे गंभीर जख्मी झाले असून यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.
घटने बाबत सविस्तर असे की, देवरी येथून मित्राच्या लग्न मांडव चा कार्यक्रम आटोपून परत शिरपूर कडे परत येत असताना रात्री २.३० च्या दरम्यान वाहन वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला. ज्या लेंडारी नाल्या वर हा अपघात झाला तो क्षेत्र निर्जन असल्याने व वाहन पुलिया खाली पडल्याने रात भर कुठलीही मदत मिळाली नाही. अपघात झाल्याने वाहनाचे ४ ही दरवाजे लॉक झाले होते. रात्र भर वाहनात अडकून असलेल्या अपघातग्रस्तांना सकाळी ६ वज्याच्या दरम्यान धावण्या करिता आलेल्या एका मुलाने बघितले. त्याने यांना वाहनातून बाहेर निघण्यासाठी मदत केली व मोबाईल शोधून कुरखेडा येथील सोहम कांबळे यास घटनेची माहिती दिली. सोहम ने चारचाकी वाहन घेवून मित्रांसमवेत घटना स्थालाकडे धाव घेत घटना स्थालावरून जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्या नंतर त्यांना पुढील उपचार करिता ब्रम्हपुरी येथे अस्थी तज्ञ कडे उपचाराकरिता घेवून गेल्याची माहिती आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!