“वन जमिनीवरील निवासी अतिक्रमण वन संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्तावित करून आबादी क्षेत्र म्हणून घोषित करा;” आम् आदमी पार्टीची शासन दरबारी हाक!
1 min readकुरखेडा, (प्रतिनिधी); ११ एप्रिल: कुरखेडा येथील वन जमिनीवरील निवासी अतिक्रमण वन संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्तावित करून आबादी क्षेत्र म्हणून घोषित करणे बाबत मागणी करिता आज गडचिरोली येथे आम् आदमी पार्टीच्या नेतृत्वात अतिक्रमण धारकांनी मुख्यवन संरक्षक यांना निवेदन सादर केले.
कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत असलेले अधिकांश जमीन क्षेत्र हे वन भूमी असून या मध्ये झुडपी जंगल, मोठ्या झाडाचा जंगल असा वन क्षेत्र म्हणून सरकारी दप्तरी नोंद आहे.
परंतु प्रत्यक्षात येथे मागील अनेक वर्षापासून निवासी प्रयोजन करिता लोकांनी घर बांधून आपले वास्तव्य कायम केले आहे. गावाची वाढती लोकसंख्या व सीमित आबादी क्षेत्र असल्याने लोकांनी गावालगत झाडे नसलेल्या खुल्या वन जमिनीचा उपयोग निवासी प्रयोजन करिता पक्के बांधकाम केलेला आहे.
मागील अनेक वर्षापासून येथे वास्तव्य करीत असलेल्या या लोकांना जमिनीचे अधिकार मिळालेलं नाही. नगर पंचायत क्षेत्र कडून मिळणाऱ्या कुठल्याही सुविधा उदा. घरकुल वन या क्षेत्रात रहिवासी असलेल्यांना मिळत नसल्याने सदर क्षेत्र वन भूमी प्रवर्गातून आबादी क्षेत्र म्हणून घोषित होणे करिता शासनास वन संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्ताव सादर करावा ही विनंती मुख्य वन संरक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतांना आम् आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसागडे, कुरखेडा तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, तालुका सचिव ताहीर शेख, जिल्हा युवा कार्यकारी सदस्य हिरालाल चौधरी, रंजना मेश्राम, हिरालाल शेंडे, निळकंठ मेश्राम, रामचन्द्र जांभूळकर, सुनीता तावाडे, चक्रधारी शेंडे, रेखा नीमजे, शंकर ठाकरे, माधुरी चौधरी,रमशिला गुहाल, कोमल घोडीचोर, उषा झाडे, गीताबाई गुहाल, जिजाबाई कापगते, जयचंद्र राऊत, जयंत गरमडे, मधुकर गोटमारे, सिद्धार्थ आघात, पंकज राऊत, वंचडाबाई कोसारे, पुष्पा सोरते, शशिकला राऊत, प्रतीक रामटेके, रवींद्र नेवारे, छगनीबाई गणबोईर, रवींद्र बोदेले, मनोरमा लाडे, अनिल कन्नाके, मुरलीधर कसारे, नलिनी जंनबंधू, मसाजी इंदुरकर, रमेश लाडे, नंदा बेहार, शशिकला खोब्रागडे, कुसुम साहारे, शीला वंजारी, कमलाबाई दुफारे, संगीता जांभूळकर, मंदा बारसागडे, विलास मांजरे, रंजना चौधरी, सत्यवान राउत, पवनकुमार राउत, शकुंतला शेंडे, नंदा साहारे, आशा राखुंडे, नामदेव ठाकरे, प्रेमिला देशमुख, किशोर चौधरी, सुनंदा चौधरी, भागरथा टेंभुर्ण, सारुबाई हलामी, महागाबई घोडाम, गुरुदेव लाडे, जास्वंदां नेवारे, पंचशिला सहारे, कसारेबाई आदी उपस्थित होते.