December 23, 2024

“कुरखेडा विद्युत पुरवठा वाहिनी ३३ के. व्ही. वरून १३२ के. व्ही. करण्यासाठी अधीक्षक अभियंत्यांना साखळे”

1 min read

“आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी जिल्हा मुख्यालयात धडक देत मागणी पूर्ण करण्यासाठी दिले निवेदन”

गडचिरोली (प्रतिनिधी); ११ मार्च: कुरखेडा येथील विद्युत पुरवठा वाहिनी ३३ के. व्ही. वरून १३२ के. व्ही. करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात कुरखेडा येथील शेकडो नागरिकांनी जिल्हा मुख्यालयात धडक देत मागणी पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंत्यांना भेटून निवेदन सादर केले.
कुरखेडा तालुक्यात नेहमी विद्युत भारनियमन व विविध कारणाने खंडित वीज पुरवठा केला जातो. या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासामुळे शेतकरी व निवासी विजधारक खूप कंटाळले असून या वीज खंडित पुरवठ्या बाबत गंभीर दखल घेवून विद्युत वितरण व पारेषण विभागाने तालुक्यातील 33 के व्ही वीज जोडणी 132 के व्ही मध्ये रुपांतरीत करून तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा या मागणी करिता गडचिरोली येथील वीज वितरण व पारेषण विभागाचे अधीक्षक अभियंता यांना भेटून तालुक्यातील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
नुकत्याच कुरखेडा तालुक्यातील कुंभितोला येथील एका शेतकऱ्याने अनियमित वीज भारनियमनाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. तालुक्यातील अनियमित वीज पुरवठा व अघोषित भारनियमनाला कंटाळून येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देत उपविभागीय अभियंता यांच्या निवासस्थानी घेराव घालत मोठा जमाव केला होता. वेळीच पोलिस प्रशसन व स्थानिक आम् आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यास्थिती करीत जमाव सोबत संवाद करून परिस्थिती हाताळली होती.
या वेळी झालेल्या चर्चेत कुरखेडा येथे 33 के व्ही वीज पुरवठा कमी पडत असून, या करिता 132 के व्ही वीज जोडणी सुरू झाल्यास तालुक्यातील वीज समस्या मार्गी लागू शकते असा निकष निघाला.
तालुक्यात सध्या मागणी पेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने वीज भारनियमन, कमी व्होल्टेज, वारंवार वीज खंडित होणे, वीज जोडणी मध्ये बिघाड होणे अश्या समस्या उद्भवत असतात. या संपूर्ण समस्येचे एकमात्र समाधान म्हणजे तालुक्यातील वीज जोडणी 132 के व्ही होणे खूप गरजेचे आहे.
“132 के व्ही सबस्टेशन मंजूर, पण जागा उपलब्ध न झाल्याने काम रखडले”
गडचिरोली येथे अधीक्षक अभियंता यांचेशी झालेल्या चर्चेत त्यांनी कुरखेडा येथील शिष्ट मंडळाला सांगितले की १३२ के व्ही वीज पुरवठा करिता प्रस्ताव मंजूर असून तालुक्यात जागा शोधणे सुरू आहे. या प्रकल्पाला उभरण्या करिता किमान २५ एकर जागेची आवश्यकता असते. एवढी मोठी जागा उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प उभारणीचे काम रेंगाळत असल्याचे ही त्यांनी सांगितले. वीज महापरेशन कडून जागेचा शोध सुरू असून जागा उपलब्ध होताच लवकरच प्रकल्प उभारणी करून १३२ के व्ही वीज पुरवठा सुरू करू असे आश्वासन या वेळी दिले.
निवेदन सादर करतांना आम् आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसागडे, कुरखेडा तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, तालुका सचिव ताहीर शेख, जिल्हा युवा कार्यकारी सदस्य हिरालाल चौधरी, रंजना मेश्राम, हिरालाल शेंडे, निळकंठ मेश्राम, रामचन्द्र जांभूळकर, सुनीता तावाडे, चक्रधारी शेंडे, रेखा नीमजे, शंकर ठाकरे, माधुरी चौधरी,रमशिला गुहाल, कोमल घोडीचोर, उषा झाडे, गीताबाई गुहाल, जिजाबाई कापगते, जयचंद्र राऊत, जयंत गरमडे, मधुकर गोटमारे, सिद्धार्थ आघात, पंकज राऊत, वंचडाबाई कोसारे, पुष्पा सोरते, शशिकला राऊत, प्रतीक रामटेके, रवींद्र नेवारे, छगनीबाई गणबोईर, रवींद्र बोदेले, मनोरमा लाडे, अनिल कन्नाके, मुरलीधर कसारे, नलिनी जंनबंधू, मसाजी इंदुरकर, रमेश लाडे, नंदा बेहार, शशिकला खोब्रागडे, कुसुम साहारे, शीला वंजारी, कमलाबाई दुफारे, संगीता जांभूळकर, मंदा बारसागडे, विलास मांजरे, रंजना चौधरी, सत्यवान राउत, पवनकुमार राउत, शकुंतला शेंडे, नंदा साहारे, आशा राखुंडे, नामदेव ठाकरे, प्रेमिला देशमुख, किशोर चौधरी, सुनंदा चौधरी, भागरथा टेंभुर्ण, सारुबाई हलामी, महागाबई घोडाम, गुरुदेव लाडे, जास्वंदां नेवारे, पंचशिला सहारे, कसारेबाई आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!