December 23, 2024

श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी

1 min read

कुरखेडा (प्रतिनिधी); १४ एप्रिल: आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे महामानव, युगपुरुष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एल.डबलू.बडवाईक, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक एस.एम.सोनुल ,प्रा. प्रदीप पाटणकर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचा इतिहास पटवून सांगितला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विध्यार्थीनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी शिक्षक मा.एस आर कोडापे मा. एस. बी शिरपूरवार, मा. डी. एम. नाकतोडे , मा. एन. एस. माकडे,मा. व्ही. व्हि. फाये, मा. व्ही. बि. मेश्राम, कु. एल. आर. राऊत, मा. व्ही. एस. मस्के, मा. आर. एम. पंधरे, तथा ज्युनिअर विभाग मधून प्राध्यापिका, ए. एल. कावळे, प्रा. व्ही. पि. नागपूरकर, प्राध्यापिका, रागिणी दखने, अपूर्वा बाबोळे, व शिक्षकेतर कर्मचारी , एस. व्ही. भरने, बी.एस.बारसागडे, ए. एस. परसूरामकर, एम. एन. बोदेले. शिपाई युवराज कुथे, उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख हायस्कूल विभाग, नरहरि माकडे यांनी केले तर आभार जूनियर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोद नागपूरकर यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!