“कुरखेडा येथे शिक्षिकाचा संशयास्पद मृत्यू; विहरीत तरंगताना आढळला शव”

कुरखेडा; (प्रतिनिधी); २३ एप्रिल: तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोठणगाव येथे अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक संजय टेमसूजी बगमारे ( ५५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून यांचे प्रेत कुरखेडा शहराला लागून असलेल्या शेतातील विहिरीत आज सकाळी ९वाजेच्या दरम्यान आढळला.

शेतातील विहिरीत शव तरंगत असताना दिसताच शेत मालकाने गावात येवून हि घटना लोकांना सांगितली असता नागरिकांनी शेतात धाव घेवून कुरखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने शव विहिरीतून बाहेर काढत ताब्यात घेवून उत्तरीय तपासणी करीत शवविच्छेदन करिता पाठीवले.
संजय बगमारे हे हसमुख व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या या प्रकारे जाण्याने गोठनगाव येथे लहान मोठे सर्वच व्याकूळ झाले होते.
संजय बगमारे या शिक्षकाच्या पच्यात त्यांना पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा अधिकचा तपास कुरखेडा पोलीस स्टेशन करीत आहे.