“डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समरसतेचे सागर : प्रा.शिवणकर यांचे प्रतिपादन”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १४ एप्रिल: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह कुरखेडा येथे वक्तृत्व स्पर्धा आणि गितगायन स्पर्धा संम्पन्न झाली. सादर स्पर्धेत अनेक विधार्थीनीं भाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाखा अध्यक्ष कुरखेडा प्रा. देवेंद्र शिवणकर हे होते. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. शिवणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समरसतेचे सागर होते असे प्रतिपादन यावेळी केले. अध्यक्षीय भाषनात देवेंद्र शिवणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक गीत सादर करून त्यांचे देशाप्रती योगदान, त्याग प्रेरणा याबद्दल सखोल माहिती आपल्या वक्तव्यातून दिली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी नगरमंत्री प्रयाग बन्सोड, महाविद्यालय प्रमुख ओमप्रकाश तरार, विध्यार्थीनी प्रमुख कु.वैष्णवी दरवडे, प्रणाली वैरागडे, लीना शिवणकर,अक्षय काळबांधे,सचिन दरवडे, डेहेरलाल नैताम, दिनेश प्रधान,सोबत वसतिगृहातील कर्मचारी मंगेश रासेकर सर ,सखाराम नरोटे सर आणि मोठ्यासंख्येने विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात गितगायनाने कु. प्रणाली वैरागडे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुरखेडा शाखेचे नगरमंत्री प्रयाग बन्सोड यांनी केले तसेच रासेकर आणि नरोटे यांनी ही विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय काळबांधे, आभार वैशाली दरवडे आणि सोशिअल मीडिया अभाविप महाविद्यालय प्रमुख ओमप्रकाश तरार यांना सांभाळले.