December 23, 2024

“अवकाळी पावसाने भरले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; मक्का शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान”

1 min read

“धान उत्पादक शेतकरी ही अस्मानी संकटाने त्रस्त; वाऱ्यासह येणाऱ्या पावसाने धान पीक भुईसपाट”

कुरखेडा; (प्रतिनिधी); ०५ मे : महिन्याच्या सुरवातीला सुरू झालेलं अवकाळी पाऊस अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू भरून गेला आहे. हातात आलेले मक्का पीक पूर्णतः खराब झाले असून मळणी केल्यानंतर वारू टाकलेले शेकडो टन मक्का पाण्यात भिजून बीज कोम फुटल्या आहेत.


कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी मक्का उत्पादन घेतात. कमी पाण्याचं पीक म्हणून धान ऐवजी शेतकरी मक्का लागवडीस प्राधान्य देतात. उत्पादन खर्चाच्या तुलनेत या शेतमालास चांगले बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी मक्का लागवड करून उत्पादन घेतात. या वर्षी उत्पादन चागल्या दर्ज्याचा आला होता. आपल्या उत्पादनास चांगला मोबदला मिळेल या आशेने शेतकरी असतानाच येन मळणी करताच अवकाळी पावसाने थैमान घातलं. मळणी झालं मक्का उघड्यावर ठेवला असल्याने ते झाकून ठेवणे करिता हजारो रुपये ताडपत्री व मेनकापड खरेदी करून ठेवला होता. वाऱ्या सह येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या या झाकून ठेवलेल्या ताडपत्री अस्त व्यस्त केला. मक्का पाण्यात भिजल्याने अक्षरशः दाण्याला कोमा फुटल्या असून लाखो रुपये मूल्य असलेलं शेकडो टन मक्का खराब झाला आहे. तालुक्यात डांबरी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात मक्का ठेवलं असल्याचे चित्र आहे.


“शेतातून बाहेर पडलेल्या उत्पादनास झालेल्या नुकसानीचा सरकार भरपाई देणार नाही”
उघड डोळ्याने शेतकऱ्यांचा नुकसान झाल्याचं दिसत असले तरी शासन दरबारी हे नुकसान मान्य नाही. शेतातील उभेपिक खराब झाले असल्यास शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असल्याची माहिती येथील राजपत्रित अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना चर्चा करताना दिली आहे. म्हणजे शेतमाल शेतातून काढून बाहेर ठेले की शासनाची धोरण बदलून जबाबदारी संपुष्टात येते असेच काही शेतकरी विरोधी नियम आहे. लाखो रुपये शेतमाल खराब होवून ही शेतकऱ्यांना कवडीचाही शासन मदत करणार नाही म्हणजे नवलच.

About The Author

error: Content is protected !!