December 23, 2024

गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा – संतोष सुरपाम

1 min read

“आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित कडे रामनगर नागपुर कार्यालयात प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली मागणी” पदभरती मध्ये आदिवासीसाठी पद असणे गरजेचे,आपन स्वत: कुलगुरू यांच्याशी चर्चा करु असे दिले आश्वासन

गडचिरोली;(प्रतिनिधी); ५मे : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा प्राध्यापक पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध केली त्यात एकही अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव ठेवल्या गेली नाही. सदर पदभरती तत्काळ रद्द करावी अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या जाहीराती मध्ये ईग्रजी 1, गणीत 1 ,रसायनशास्त्र-4, भौतिकशास्त्र-4, कॉम्पुटर सायन्स-4, ऊपयोजीत अर्थशास्त्र -4, मराठी-4, एमबीए-4, जनसंवाद-4, विषययाकरीत एकुन 30 पदे प्राध्यापक म्हणून भरती प्रक्रिया राबवायची आहे परंतु त्यांमध्ये एसी-1,विजे(ए)-1,एनटी(सी)-2,एनटी(डी)-1, एसबीसी-1,ओबीसी-9,ईडब्ल्यूएस- 3,व ओपन -9 पन यात अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता करीता राखीव एकही जागा न ठेवल्याने ही जाहीरात व प्राध्यापक पदभरती रद्द करावी, त्या सोबतच संवर्गनिहाय पदभरती न करता विषय निहाय आरक्षण देऊन पदभरती करावी अश्या आशयाचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत, यांना रामनगर नागपुर येथील कार्यालयातल प्रत्यक्ष भेटुम निवेदन दिले याविषयी आपन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी स्वत: वार्तालाप करु आणी अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव असल्याशिवाय पदभरती होणार नाही असे आश्वासन अध्यक्ष संतोष सुरपाम यांना दिले असल्याची माहीती दिली आहे

About The Author

error: Content is protected !!