“*पुन्हा गावाला लागूनच विटा भट्टी लावने व टाकने सूरु:लोकांचे आरोग्य धोक्यात*”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १८ मे: प्रशासनाने गावापासून पाचशे मीटर अंतरावर दूर विटा भट्टी लावण्यात व टाकण्यात यावे असे सूचना विटा भट्टी परवानाधारकांना देऊनही तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध विटाभट्टी , धारकांनी मुजोरिने पुन्हा विटा भट्टी पेटवायला व लावायला सुरुवात केल्याने गावातील वातावरण पुन्हा पेटलेला आहे .
अशा मुजोर विटा भट्टी धारकावर लगेच चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मागील दोन महिन्यापासून विटा भट्टी धारकांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी गावाजवळ असलेल्या विटा भट्टी लावणे बंद केले होते परंतु पुन्हा आता नव्या जोमात विटापट्टी गावाला लागूनच पेटवल्या जात असल्याने विटा भट्टीतील राकड गावात उडत असल्याने गावात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे लगेच त्या विटाभट्या थांबवण्यात यावा व पाचशे मीटरच्या अंतरावर लावण्यात यावा अशी मागणी गावकरी करत आहेत अन्यथा पाच दिवसात जर कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही उपोषणावर बसून असा इशारा गावकऱ्यांनी महसूल विभागाला दिला आहे .
गावाजवळच विटा भट्टी लावल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. या अगोदर सुद्धा तालुक्यातील अवैध गौण उत्खनन करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणी करिता निवेदने सादर करून कंटाळलेल्या गावकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेवून आहे. १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला होता तेव्हा कुंभीटोला या गावालगत व नदी किनारी सुरू असलेल्या विटा भट्टी गावा पासून ५०० मीटर दूर अंतरावर करण्यासाठी निर्बंध घालणे बाबत येथील तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १६ जानेवारीला २०२३ ला निवेदन सादर केले होते. कुंभिटोला या गावाच्या ५०० मीटर परिसरात विटा भट्टी लावल्याने विटा भट्टी मधील राखड हवेने गावात उडून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तरी सदर कुंभीटोला गाव लगतच्या विटा भट्टी धारकांना गावा पासून ५०० मीटर दूर अंतरावर खोदकाम करणेस निर्बंध घालण्यात यावे करिता समस्त कुंभिटोला येथील नागरिक निवेदन सादर केले आहे, तेव्हा महसूल विभागाने कारवाई सुद्धा केली होती तरी पण पुन्हा गावाजवळच विटा टाकायला व भट्टी लावायला सुरुवात झाल्याने गावामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे करिता तात्काळ विटा भट्टी लावण्या पासून व पेटविण्यापासून थांबवण्यात यावे अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे.