“खरेदी विक्री संस्थेवर पोरेड्डीवार गटाची एकहाती सत्ता: नागीलवार सभापती तर डोंगरवार उपसभापति पदावर अविरोध निवड”
1 min readकूरखेडा; (प्रतिनिधी); १९ मे : कृषी औद्योगिक खरेदी विक्री सहकारी संस्था कूरखेडा येथील पदाधिकारी करीता आज शूक्रवार रोजी घेण्यात आलेल्या पंचवार्षीक निवडणूकीत सभापति पदावर पोरेड्डीवार गटाचे व्यंकटी नागीलवार तर उपसभापति पदावर हरिश्चंद्र डोगंरवार यांची अविरोध निवड संपन्न झाली.
संस्थेवर स्थापने पासूनच पोरेड्डीवार सावकार गटाचे वर्चस्व कायम आहे यावेळी सूद्धा येथील १३ सदस्यीय संचालक मंडळाची निवड अविरोध झाली होती आज सभापति उपसभापति पदाची निवड सूद्धा अविरोधच संपन्न झाली. निवडणूकीची मोर्चेबांधणी सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार व ज्येष्ठ सहकार नेते नागरी बैकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा मार्गदर्शनात तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांचा नेतृत्वात करण्यात आली होती. आज सभापति उपसभापति निवडणूकी करीता आयोजित विशेष सभेचा अध्यक्षस्थानी सहकार अधिकारी श्रेणी १ सूशील वानखेड़े होते यावेळी नवनिर्वाचित संचालक व्यंकटी नागीलवार, हरिश्चंद्र डोगंरवार, वसंतराव मेश्राम,गणपत सोनकूसरे, अॅड उमेश वालदे, आनंदराव जांभूळकर, उध्दव गहाणे, काशीनाथ दोनाडकर, जयवंत कापकर, आनंदराव आकरे,जिवन मेश्राम,पुष्पाबाई डोंगरवार व लताबाई धाबेकर उपस्थीत होते यावेळी सभापति व उपसभापति करीता प्रत्येकी एकच नामांकन असल्याने नागीलवार व डोगंरवार यांचा अविरोध निवड ची औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सूशील वानखेड़े यानी केली. निवडणूक परीणामाची घोषणा होताच संस्थेचा आवारातच जिल्हा बैकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांचा नेतृत्वात नवनिर्वाचित पदाधिकार्याना पूष्पहार प्रदान करीत, तसेच गूलाल व फटाक्याची आतिशबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.