April 26, 2025

“गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती वरून वाद; यादीतून शिवसैनिकांना डावलले”

“युती सरकारमध्ये ६०-४० असा ‘फॉर्म्युला’ ठरलेला असताना देखील गडचिरोली जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याला संधी देण्यात आली नाही”

गडचिरोली; (प्रतिनिधी); २० मे: भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती सरकारमध्ये ६०-४० असा ‘फॉर्म्युला’ ठरलेला असताना देखील गडचिरोली जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याला संधी देण्यात आली नाही. नुकतीच यासंदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात ११ भाजप नेत्यांची वर्णी लागल्याने शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात भाजपा-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेतील नेत्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नेते खासगीत करताना दिसून येतात. राज्य किंवा जिल्हा पातळीवरील विविध समित्यांवर भाजपा नेत्यांचेच वर्चस्व आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे मागवली जातात पण ऐनवेळी ती वगळण्यात येतात. गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांसाठी देखील ६०-४० ‘फॉर्म्युला’प्रमाणे भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांची नावे पाठविण्यात आले होते.
मात्र, जाहीर करण्यात आलेल्या यादीत केवळ भाजप नेत्यांनीच नावे आहेत. शिवसेनेच्या एकाही नेत्याला त्यात स्थान देण्यात आले नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेते दुखावले असून भाजपाने युतीधर्माचे पालन केले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. ६०-४० ‘फॉर्म्युला’प्रमाणे जिल्हा नियोजन समितीसाठी आम्ही देखील नावे पाठविली होती. पण अंतिम यादीत शिवसेनेच्या एकाही व्यक्तीचे नाव नाही. अकराही जागेवर भाजपाच्या नेत्यांनीच वर्णी लावण्यात आली. याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहो, अशी भावना शिवसेना नेते हेमंत जम्बेवार यांनी व्यक्त केली.
यांची वर्णी
भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बाबूराव कोहळे, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपचे नेते गोविंद सारडा, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, कलाम पिर मोहम्मद, सदानंद कुथे, सुनिल बिश्वास यांचा समावेश आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!