April 27, 2025

“गोठनगाव – शिवणी वळणावर दोन दूचाकीची समोरा समोर धडक १ ठार ; ४ गंभीर”

कूरखेडा; (प्रतिनिधि); २० मे : कूरखेडा-मालेवाडा मार्गावरील गोठणगांव जवळ दोन दूचाकीची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने एक दूचाकीस्वार जागीच ठार झाला तर इतर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सांयकाळी ७.३० वाजेचा सूमारास घडली.

एम. एच. ३३ आर ५६५०, एम. एच. ३३ ए ई ५२७० या दोन दुचाकी समोरासमोर आदळून झालेल्या अपघातात ठार झालेल्या दूचाकी स्वाराचे नाव लोकेश चाफा वय २७ रा. चांदोना, तर गंभीर जखमी जागेश्वर नेटी वय २६ विक्रांत हूंडरा २७ तिन्ही रा चिचटोला व प्रशांत तूकाराम मारगाये वय २० व राहूल डोंगरवार वय २५ रा. शिवणी हे गंभीर जखमी झाले आहेत. चिचटोला येथील तिन यूवक कूरखेडा येथून स्वगावी चिचटोला येथे ट्रीपल सिट जात असताना याच वेळी शिवणी येथील दोन यूवक कूरखेडा कडे येत होते या दोन दूचाकीची गोठणगांव वळणावर दोन्ही दूचाकीची समोरा समोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भिषण होती की एक दूचाकीस्वार जागीच ठार झाला ४ गंभीर जखमी झाले. अपघाताची माहीती मीळताच येथील सामाजिक कार्यकर्ते शहेजाद हाशमी रोशन मेश्राम,बंटी देवढगले, आपचे तालुका संयोजक ईश्वर ठाकूर यानी घटणास्थळी धाव घेत रूग्नवाहीकेने सर्वाना येथील उपजिल्हा रूग्नालयात दाखल केले. मात्र परीस्थीती गंभीर असल्याने येथे प्राथमिक उपचार करीत त्याना उपचार करीता जिल्हा सामान्य रूग्नालयात हलविण्यात सल्ला वैद्यकीय अधिकार्याकडून देण्यात आला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!