April 25, 2025

“8650567567 वर मिसकॉल करा व मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळवा”

गडचिरोली;( प्रतिनिधी); 24मे : विविध शस्त्रक्रिया आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत संपूर्ण माहिती अनेकदा रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना नसते. त्यामुळे अनेक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून, फक्त एका मिसकॉल वर आता ही माहिती मिळणे शक्य होणार आहे. यासाठी 8650567567 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. विशिष्ट ग्रामीण भागातील जनतेला हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या क्रमांकावर मिस कॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजारांवरील उपचार शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत 60 कोटींवर निधीचे वाटप करण्यात आले आहे. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. मात्र हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षा पर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही अशा जनतेसाठी ही मिस कॉल ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“अशी असेल प्रक्रिया”
मिस कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएस द्वारे मोबाईल वर येईल. त्या लिंक वर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट आउट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.inया ईमेल आयडीवर पाठवता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिल्यांदाच भाजलेल्या, शॉक लागलेल्या रुग्णांनाही प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!