“कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी ठाकर यांच्या मनमानी विरोधात शहरवासीय आक्रमक” ; “शल्यचिकीत्सकाना सर्वपक्षीय निवेदन सादर करून हकालपट्टी करण्याची मागणी”
1 min readकूरखेडा;(प्रतिनिधी); २५ मे: उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथे मागील २५ वर्षापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी ठाकर यांचा मनमानी, मूजोरी, बेजबाबदार तसेच सूडभावणापूर्ण वागणूकीने त्रस्त येथील सर्व पक्षीय शहरवासीयानी आज गूरूवार रोजी येथील उपजिल्हा रूग्नालयात धडक देत वैद्यकीय अधिक्षक डॉ अमीत ठमके यांचाशी चर्चा केली व त्यांचाकडे डॉ. ठाकर यांचा मनमानी कार्यप्रणालीचा पाढा वाचला तसेच त्यांचा मार्फत जिल्हा शल्यचिकीत्सकाना निवेदन पाठवत त्यांचा चौकशी करीत तत्काळ येथून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
डॉ संभाजी ठाकर बधीरीकरण तज्ञ आहेत येथील रूग्नालयात सूसज्ज शस्त्रक्रीया गृह आहे येथे नियमित प्रसूती शस्त्रक्रीयासह अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रीया पार पडतात. शस्त्रक्रीया प्रक्रीयेत बधिरीकरण तज्ञांची महत्वाची भूमीका असते त्यानी तपासणी करीत फिटनेस प्रमाणीत केल्याशिवाय शस्त्रक्रीयेची पूढील प्रक्रीया होऊ शकत नाही. याच बाबीचा ते नेहमी गैरफायदा घेत ते अनेक रुग्णांची अडवणूक करतात. बिपीचा त्रास आहे , रक्ताची कमतरता आहे. अशी खोटी भीती दाखवत त्याना रेफर करीत खाजगी रूग्नालयात जाण्यास बाध्य करतात. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांचा मनमानीचा पाढा वाचताना त्यानी शस्त्रक्रीये करीता विनंती करूनही नकार दिलेल्या नंतर त्या रुग्णांची शस्त्रक्रीया त्याच दिवशी याच रूग्नालयात ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्नालयातील बधीरीकरण तज्ञ पाचारण करीत कोणत्याही अडचणी शिवाय यशस्वीपणे पार पडली. तसेच अनेक रुग्णाची येथे शस्त्रक्रीया करने शक्य असताना त्यानी आपली मनमानी चालवित फिटनेस प्रमाणीत करण्यास नकार दिल्याने त्याना इतरत्र हलवावे लागले. तिथे शस्त्रक्रीया कोणत्याही जोखीमे शिवाय यशस्वीपणे पार पडल्या. मात्र रुग्णांना अधिकचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सलग २५ वर्षापासून एकाच ठिकाणी ते सेवा बजावत असल्याने येथे त्यांचे हितसंबध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही हितसंबधी लोकांनाच ते सेवा देतात मात्र इतरा संदर्भात त्यांची वागणूक सौहार्द्रपूर्ण नाही. त्यामूळे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामूळे तातडीने त्यांची चौकशी करीत त्यांची येथून हकालपट्टी करावी अन्यथा सर्व पक्षीय शहर वासीया कडून उपजिल्हा रूग्नालयावर मोर्चा काढत वैद्यकीय अधिक्षकांचा दालनाला कूलूप ठोकण्यात येईल असा इशारा सूद्धा निवेदनात दिला आहे. या निवेदन सदर करतेवेळी भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये तालुका कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिवन पाटील नाट भाजपा तालुका अध्यक्ष नाजूक पूराम जिल्हा नियोजन समीती सदस्य बबलू हूसैनी माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी भाजपा जिल्हा सचिव विलास गावंडे माझी प स सभापति गिरीधर तितराम उपसभापति मनोज दूनेदार भाजपा ता महामंत्री तथा नगरसेवक अॅड उमेश वालदे माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी,उल्हास देशमुख कांग्रेस ता उपाध्यक्ष शोएब मस्तान नगरपंचायतचे आरोग्य सभापति अतूल झोळे उपजिल्हा रूग्नालय रूग्नकल्याण समीती सदस्य सिराज पठान,विवेक निरंकारी नगरसेवक सागर निरंकारी,अलका गिरडकर कांग्रेस अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष जावेद शेख भाजयुमो चे तालुका अध्यक्ष प्रा विनोद नागपूरकर यूवक कांग्रेस शहर अध्यक्ष रोहित ढवळे राष्ट्रवादीचे पूरषोत्तम मडावी,नाजूक दखने,माजी नगरसेवक उसमान पठान,सादीक शेख,वैभव बंसोड,माजी सरपंच संजय कोरेटी, रितेश मनूजा, मधूकर वारजूरकर,पंकज टेभूंर्णे,न्याज सय्यद,अरशद खान व शहर वासीय उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी काही कालावधी करीता डॉ ठाकर यांचाकडे उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथील वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार होता. दरम्यान त्यांचा कार्यप्रणाली व मनमानीने त्रस्त येथील त्यांचा अधिनस्त अधिकारी व कर्मचार्यानी जिल्हा शल्यचिकीत्सकाना सामुहिक लेखी तक्रार केली होती. यावेळी येथील काही पदाधिकारी व नागरीकानी सूद्धा त्यांचा विरोधात तक्रार केली होती. यावेळी जिल्हा स्तरावरून तिन वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांची चौकशी समीती गठीत करीत त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी समीतीने ४१ कर्मचार्यांचे बयान नोंदवित येथील अधिकारी कर्मचारी डॉ ठाकर यांचा अधिनस्त काम करण्याची मानसिकता नाही त्यामूळे त्याना येथे ठेवल्यास कर्मचार्यांचा असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे असा अहवालात अभिप्राय जिल्हा शल्यचिकीत्सकाना सादर केला होता. यावेळी त्यांची प्रतिनियुक्तीवर ग्रामीण रूग्नालय वडसा येथे बदली करण्यात आली होती. मात्र दोन महिण्यातच प्रतिनियुक्ति रद्द करीत ते परत उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथे रूजू झाले मात्र त्यांचा कार्यप्रणालीत कोणतीच सूधारणा न झाल्याने याचा त्रास परिसरातील रूग्नाना भोगावा लागत आहे.
सदर आरोप बाबत डॉ. संभाजी ठाकर यांना संपर्क केला असता त्यांनी मोबाईल वर प्रतिसाद दिला नाही.