December 23, 2024

अखेर “त्या” कंत्राटदारावर ७५ तासानंतर गुन्हा दाखल; नगरपंचायत कडून कंत्राटदाराला काळ्या यादी टाकण्याची प्रक्रिया सुरू”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); १ जून: नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारीवर तब्बल 75 तासाच्या कालावधीनंतर अदखलपात्र 500 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल झालेल्या सदर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडात्मक प्रावधान आहेत.


कुरखेडा नगरपंचायत येथील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पैशाची देवाणघेवाण करून मनमर्जीतील कंत्राटदार याला काम देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी संगणमत केल्याची तक्रार येथील कंत्राटदार खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध वरिष्ठ स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना निवेदनातून केली होती. सदर खोट्या आरोपा वरून संतापलेल्या कुरखेडा नगरपंचायत चे पदाधिकाऱ्यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे सामूहिक तक्रार दाखल केली होती. घटनेची सविस्तर चौकशी करून व कंत्राटदार याची बाजू ऐकून कुरखेडा पोलीस यांनी बयान नोंद केला होता.
31 तारखेला कुरखेडा पोलीस स्टेशन कडून तक्रारदात्यांना जारी केलेल्या समाज पत्रामध्ये सदर प्रकरणात दाखल केलेल्या अदखलपात्र गून्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे. सदर प्रकरणात कोर्टात न्याय मागण्याची समज तक्रारदारांना पोलिसांनी दिलेली आहे.
कुरखेडा येथे एकंदरीत निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत. सदर निविदा प्रक्रिया स्थायी आदेश ३६ प्रमाणे क्रिया नियमित केला जात असल्या तरी या संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. स्थानिक नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा कुठलाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष भाग नसल्याबाबतला शपथपत्र जर या निविदेमध्ये समाविष्ट केला जात असला तरी एकंदरीत वस्तुस्थिती विपरीतच आहे. नगरपंचायत येथे होणाऱ्या कामाच्या ऑनलाईन व ऑफलाईन लिफाफा पद्धतीने झालेल्या सर्व निविदा विवादास्पद आहेत. गावातील विकास कामांना अडथळा येऊ नये म्हणून कित्येकदा या बाबींकडे डोळेझाक केली जाते. उघड डोळ्याने दिसणाऱ्या सर्व अनियमित कार्यप्रणाली येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना काही जबाबदार लोकांनी लेखी तक्रार न करता प्रत्यक्षात बोलून दाखवलेले आहेत. परंतु या वेळेस यांच्यासोबतच सत्ता सुखासोबत ठेकेदारी लाभ मिळवणाऱ्या पार्टी कार्यकर्त्यांनी आपल्याच लोकांविरुद्ध लेखी तक्रार नोंद केल्यामुळे एकंदरीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेले आहे.
सदर निविदेमध्ये काय आणि नियुक्त झाली व याबद्दल प्रशासकीय अधिकारी म्हणून नगरपंचायत प्रशासन काय करणार आहे हे अजून गुलदस्त्यातच आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये एक बाब मात्र निश्चित की कुठल्याही स्थितीमध्ये ऑनलाईन टाकलेल्या निविदा रद्द करण्याची मानसिकता नगरपंचायतची नाही हे आता स्पष्ट झाले आहे. कुरखेडा येथे कोट्यावधीचा निधी शासनाकडून प्राप्त होत असला तरी नियमित मुख्याधिकारी व प्रशस्त प्रशासनिक व्यवस्था नगरपंचायत कुरखेडा येथे नसल्याने कामाच्या गुणवत्ते सोबतच निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता अजून तरी आलेली नाही.
गुन्हा दाखल झाल्यानंतर व नगरपंचायत सदर कंत्राटदाराला कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत काळे यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रिया राबवत असताना तक्रार करणारे कंत्राटदार खुशाल रामकृष्ण बनसोड आता या प्रकरणाला न्यायालयात आव्हान देतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा नगरपंचायतीमध्ये निवडणुकीपासून तर सत्ता स्थापनेपर्यंत भूमिका बजावणाऱ्या आपल्या खंबीर कार्यकर्त्या कंत्राटदारावर या पद्धतीने फौजदारी कारवाई होईल याची तीळ मात्र ही आशा कोणालाच नव्हती. सध्या नगरपंचायत कुरखेडा येथे सुरू असलेल्या एकंदरीत नाट्यमय घडामोडींना कोणत्या प्रकारचा शेवट मिळेल हे आकलन करणे कठीण झाले आहे.

About The Author

error: Content is protected !!