“दुकान खोली तोडफोड करून विना परवानगी अवैध बांधकाम करणाऱ्या भाडेकरूला बांधकाम बंद करण्याचे नगर पंचायतचे नोटिस ; भाडेकरू कोर्टाच्या शरणी”
1 min read“आम्ही केलेले भाकीत खरे ठरत आहेत, ग्रामपंचायत कालावधीतील स्थावर मालमत्ता भाडेकरू असलेले हडपण्याचे संघटित प्रयास कुरखेडा येथे सुरू आहेत”
कुरखेडा; (प्रतिनिधी); ३१ मे : कुरखेडा नगर पंचायत येथील मालमत्ता बेवारस असल्याचे वृत्तांकन मागील आठवड्यात आम्ही केले होते. या वृत्तांकन प्रसिद्धी नंतर अनेक मालमत्ता बाबत प्रकरण उघडकीस आले आहेत.
कुरखेडा ग्रामपंचायत काळातील दुकान गाडी क्रमांक 16 व 17 या दुकानाची मोडतोड करून मुजफ्फर अब्दुल बारी यांनी कुठलीही परवानगी न घेता अवैधपणे दुकान तोडून आपल्या मर्जीने बांधकाम सुरू केल्याचा नगरपंचायतला लेखी तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल एक महिन्यांनी कानाडोळा करत बसलेल्या नगरपंचायतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर सदर बांधकाम तात्काळ थांबवण्याची नोटीस नगरपंचायतने जारी केली आहे. नगरपंचायत कुरखेडे यांनी जाहीर केलेल्या सदर नोटीसीच्या नंतरही येथील बांधकाम सुरू असून कुठलेही मालमत्ता बाबत मालकी पुरावे नसतानाही व कुठलीही बांधकामाची परवानगी नसतानाही येथील प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून नगरपंचायत कुरखेडा च्या मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे. न्यायालयात दाखल झालेल्या या प्रकरणानंतर नगरपंचायत कुरखेडा कुठली पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कुरखेडा ग्रामपंचायत चे रूपांतर नगर पंचायत मध्ये होवून ७ वर्ष होत आले तरी अजून शासकीय दप्तरी ग्रामपंचायत नावे असलेल्या मालमत्ता नगरपंचायत कडे फेरफार होवून वर्ग झालेल्या नाहीत. याचाच फायदा काही भाडेकरू घेवू पाहत आहेत. नगर पंचायत कुरखेडा यांनी मागील अनेक वर्ष बसून येथील वाणिज्यिक वापराच्या मालमत्तेचे भाडे करार नूतनीकरण केलेले नाही. नगर पंचायत कुरखेडा यांनी वेळोवेळी या भाडेकरूंना नवीन भाडे करार करण्याकरिता सूचना पत्र पाठवले आहेत. परंतु नगरपंचायत च्या या सूचनापत्राकडे कानाडोळा करत अनेक भाडे करून आपले भाडेकरार नूतनीकरण केलेले नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
यातच मागील अनेक वर्षापासून किराया भरणा न करता व वाढीव अनामत रक्कम जमा न करता सरसकट अवैध कब्जा करण्याचा डाव आखत असल्याची चित्र आहेत.
नगरपंचायत मार्गावर मुख्य रस्त्यालगत होत असलेल्या एवढ्या मोठ्या अवैध बांधकाम संदर्भात नगरपंचायतने कुठलीही कारवाई तक्रार प्राप्तीनंतर करू नये याबाबत खूप तर्कवितर्क लावले जात आहेत. नगरपंचायत च्या प्रवेशद्वारातून निघतात समोर दिसणाऱ्या बांधकामावर या प्रकारची मेहर नजर कोणाच्या इशारा वर केली जात आहे हेही चर्चेचा विषय आहे.
कुरखेडा येथील पूर्ण ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते कुंवर लोकेंद्रशहा सयाम यांनी कुरखेडा नगरपंचायत मालकीच्या दुकानाची विना परवानगी मोडतोड करून अवैधरीत्या बांधकाम करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल एक महिना वाट पाहत बसलेल्या तक्रारदार यांनी नगरपंचायत येथे पाठपुरावा केला असता त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची मूळ प्रत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
नगरपंचायत च्या आवक-जावक टेबलवर दाखल केलेल्या तक्रारी एक महिन्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचणे ही खूप मोठी प्रशासनिक अव्यवस्थेचा उदाहरण आहे. राजकीय मुख्य प्रवाहात असणाऱ्या लोकांच्या तक्रारी अर्ज सोबत या पद्धतीचा व्यवहार होत असेल तर सामान्य नागरिकांच्या दाखल केलेल्या तक्रारीवर नगरपंचायत प्रशासन कशाप्रकारे प्रतिसाद देत असेल हे संशोधनाचे विषय आहे.
आज एका भाडेकरू नये मन मर्जीने दुकान सोडून स्वतःच्या हिशोबाने बांधकाम करून घेण्याचा जो डाव घातलेला आहे यावर वेळीच जर आडा घातला नाही तर नगरपंचायत कुरखेडा अंतर्गत असलेल्या इतर मालमत्ता सुरक्षित कशा राहतील असा प्रश्न निर्माण होत आहे. जर या दुकान बांधकामाला नगरपंचायतीची कुठलीही परवानगी नव्हती तर पायव्या पासून सल्याप पर्यंत आलेल्य अवैध बांधकाम कोणाच्या लक्षात आले नसावे का? गावातील नगरसेवक व पदाधिकारी या पद्धतीने नगरपंचायत च्या मालमत्तेच्या दुरुपयोगाकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्याकडून गावाच्या विकासाची अपेक्षा कशी करायची असाही प्रश्न निर्माण होत आहे.