“जिल्हा सामान्य रुग्णलयात रक्त तुटवडा ; कुरखेडा शहरातील यूवकांनी स्वंयफर्तीने केले २६ पिशवी रक्त दान”
1 min read“संकल्प फउंडेशन, गेवर्धा चे डॉ. जगदीश बोरकर व जय विक्रांता क्रिकेट क्लब सागर निरंकारी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी, जिल्ह्यातील रुग्णांच्या मदतीला नेहमी असतात तत्पर”
कूरखेडा; (प्रतिनिधी); १ जून: जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तूटवडा निर्माण झाल्याने उपचारात अडचणी येत आहेत, ही माहीती मीळताच संकल्प फौउंडेशन व जय विक्रांता क्लबचा आवाहनानंतर येथील २६ यूवकानी आज गूरूवार रोजी उपजिल्हा रूग्नालयात आयोजित रक्तदान शिबीरात स्वंय स्फूर्त रक्तदान करीत सामाजिक बांधीलकी जोपासली.
आधुनिक उपचार पद्धतीत मानवी रक्त हा महत्वाचा घटक आहे, विविध आजार, शस्त्रक्रीया करीता मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. मात्र रक्त हा कृत्रिम रित्या कारखाण्यात तयार करता येत नाही. रक्ताची गरज ही मानवी शरीरातूनच भागवावी लागते. कुरखेडा येथील यूवक मंडळीचा नेहमीच अशा सामाजिक कार्यात पूढाकार असतो. जिल्हा सामान्य लयातील रक्त पेढीत रक्ताचा तूटवडा आहे ही माहीती संकल्प फाउंडेशन, गेवर्धा व जय विक्रांता क्रिकेट क्लब, कुरखेडा च्या सदस्याना मीळताच त्यानी पूढाकार घेत येथील उपजिल्हा रूग्नालयात आज रक्तदान शिबीराचे आयोजन करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील आम आदमी पक्षाचे तालुका संयोजक ईश्वर ठाकूर,आपचे तालुका कोषाध्यक्ष येदूनाथ नेवारे, प्रा. देवेंद्र फाये, शाहीद हाशमी, लोकेश नेवारे, उल्हास देशमुख, ललीत ठाकरे, अक्षय देशमुख, नरेन्द्र वरवाडे, आसीफ शेख, रोहित निपाने, मंसाराम नंदनवार, मनिष मशाखेत्री, शूभम मैंद, नितेश लांजेवार, गणपत बंसोड, नितेश बावणे, लवकूश मडकाम, नामदेव आडील, श्रीरसागर उईके, धम्मपाल सहारे, भागवत गायकवाड़, अमीत तूराडे, मयूर राऊत, गुलाब मस्के, पूष्पराज रहागंडाले या २६ यूवकानी स्वंय स्फूर्त रक्तदान केले शिबीरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ जगदीश बोरकर तंत्रज्ञ टिकेश्वरी करमकर, रश्मी मोगरे गडचिरोली येथील रक्तपेढीची चमू सतिश तटकलवार, प्रफूल राऊत, जिवन गेडाम, नरेश तूरंगल्लीवार यानी सेवा बजावली तर यशस्वीतेकरीता संकल्प फौउंडेशन चे अमीत ठाकरे, सूमेध रामटेके, अतूल अंबादे, राहूल पाटणकर, मनिष मेश्राम, वसीम शेख, जय विक्रांता क्लबचे नगरसेवक सागर निरंकारी, आशू बागडे, नौशाद सय्यद, पंकज टेभूंर्णे यानी प्रयत्न केले शिबीराला भाजपा जिल्हा सचिव विलास गावंडे भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये रुग्णकल्याण समीतीचे सदस्य सिराज पठान, विवेक रामाणी यानी विशेष सहकार्य केले.