December 23, 2024

“कुरखेडा येथील खाजगी दवाखान्यात उपचाराकरीता आलेल्या महिलेची छेड काढणाऱ्या डॉक्टराला अटक”; “१४ दिवसाची न्यायलयीन कोठडी”

1 min read

कूरखेडा; (प्रतिनिधी); १४ जून: औषधोपचार करीता ग्रामीण भागातून कूरखेडा येथे आलेल्या विवाहीत महिलेची छेड काढत विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला महिलेच्या तक्रारीवरून पोलीसानी बेड्या ठोकल्या आहेत. आज बूधवार रोजी कुरखेडा पोलिसांनी आरोपीला कुरखेडा येथील प्रथम श्रेणी न्यायालय समोर सादर केले असता न्यायलयाने आरोपीला १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सूनावली आहे. आरोपी डॉक्टरची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक आरोपी डॉक्टर जिबन हिरा याचा क्लीनिक आहे. मागील १५ दिवस ग्रामीण भागातील एक महिला उपलचार घेत होती. तपासणी दरम्यान डॉक्टर महिलेशी अश्लील चाळे करत असल्याने महिला संतापली होती. काल मंगळवार रोजी दूपारी ३ वाजेचा सूमारास ग्रामीण भागातून ती महिला परत तपासणी करिता आली होती मात्र यावेळी औषधोपचार न करता वाईट हेतूने डॉक्टर छेड काढत असल्याचे महिलेला जाणवताच सदर डॉक्टरला दवाखाण्यातच महिलेने आरोपी डॉक्टर ला बदडून काढले. महीले सोबत आलेल्या तिच्या पतीने ही चांगला चोप दिला असल्याचे प्रत्यक्षदर्षीनी सदर प्रतिनिधीला संगितेल. त्यांच्या तावडीतून सुटत घराकडे सदर डॉक्टर ने पळ काढला. त्याला येथील आंबेडकर चौकात ही चोप बसल्याची माहिती आहे. सदर घटने नंतर सदर महिलेने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे पोहचत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. जिबन हिरा वय (२८) याच्या विरोधात भा द वि ३५४,३५४(अ) ३५४(ब) अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायलयात हजर करण्यात आले यावेळी न्यायलयाने १४ दिवसाचा न्यायलयीन कोठडीत त्याची रवानगी केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहे.

About The Author

error: Content is protected !!