December 23, 2024

“महविकास आघाडी”: “२०२४ ची गडचिरोली – चिमूर लोकसभा करिता राष्ट्रवादी काँग्रेसची दावेदारी”

1 min read

“शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अहेरी चे राजे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे संभाव्य उमेदवार म्हणून शक्तिप्रदर्शन”

मुंबई; (ब्यूरो); १४ जून: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सदर्भात महाविकास ने राज्यांतील 48 लोकसभा क्षेत्र व उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज 14 जुन रोजी मुबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार याच्या अध्यक्षतेखाली, जयंत पाटील, प्रफुल्ल भाई पटेल, अजित दादा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे,अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, प्राजक्त तनपुरे, महेबुब शेख यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या महत्वाच्या बैठकीत गडचिरोली लोकसभेचे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकिकरीता गडचिरोली जिल्हातील प्रमुख नेते व पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व बर्मपूरी विधानसभेत प्रमुख नेते व पदाधिकारी तसेच गोंदिया जिल्हातील आमगाव विधानसभेतील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेअंती २०२४ ची गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने लढवावी असा एकमताने निर्धार करण्यात आला. या बैठकीला लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून अहेरी चे राजे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलाखत दिली व शरदचंद्र पवार यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पूर्व तयारी संदर्भात आपली बाजू मांडली.

सदर प्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, गोंदिया जिल्हाध्यक्ष , जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, युवक कार्याध्यक्ष नितीन भटारकर, महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, चंद्रपूर महिला अध्यक्ष बेबी उईके, योगेश नाकाडे, कपिल बागडे, फहीम काजी, ग्यानकुमारी कौशिक तसेच लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, युवक जिल्हाअध्यक्ष, महिला अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधान सभा अध्यक्ष उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!