April 26, 2025

“तहसीलदार राजकुमार धनबाते यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने सम्मान सत्कार”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १४ जून : कुरखेडा येथील नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारताच तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवरत तालुक्यात कायद्याचा शासन आहे असा संदेश धडक कार्यवाही करत धाड सत्र सुरू केलेलं आहे. श्री. धनबाते यांनी स्थानिक पत्रकार यांच्या लेखणीला न्याय देत केलेल्या करवाहिमुळे लोकमानसात प्रशासन प्रती विश्वास पुनर्स्थापित झाला आहे. याचाच औचित्य साधून कुरखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने येथील तहसील कार्यालय कक्षात राजकुमार धनबाते यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान सत्कार करण्यात आला.
शासनाचा लाखोंचा महसूल बुडवू पाहणाऱ्यांच्या मुसक्या आवरत पूर्वी जे काही भोंगळ कारभार तहसील कार्यालयात चालत होते त्यावर विराम लावलेला आहे. श्री. धनबाते यांनी पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मान सत्कार स्वीकारताना भ्रष्टाचार मुक्त लोकाभिमुख प्रशासन कुरखेडा येथे कायम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा मनोगत व्यक्त केला. सामान्य माणसाचे व जनसामान्यांचे अडचणी दूर करणे हेच चागल्या प्रशासन व्यवस्थेत अपेक्षित असते. कुरखेडा शहर व ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींचे प्रशासन प्रति विश्वास निर्माण होवून आपुलकी प्रस्थापित व्हावी यासाठी कटिबध्द असल्याचे ही ते बोलले.
सदर सन्मान सत्कार प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठान सचिव नसीर हाशमी सहसचिव प्रा. विनोद नागपूरकर सदस्य उपाध्यक्ष विजय भैसारे, महेन्द्र लाडे, कृष्णाजी चौधरी, ताहीर शेख, शिवा भोयर, चेतन गहाणे, सूरज गावतूरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!