“पेरमिलीत नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवून काढली रैली; आदिवासी मुली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उतरले रस्त्यावर”.
1 min readअहेरी; (अन्वर शेख); प्रतिनिधी; १५ जून: अहेरी तालुक्यातील आलापली येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडल्याने संपुर्ण जिल्हा हादरला आहे.या घटनेचा जिल्ह्यात निषेध केला जात आहे.
१४ जुन रोजी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे आदिवासी विद्यार्थी संघाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच पेरमिली ग्रा.प.चे माजी सरपंच प्रमोद आञाम यांच्या नेतुत्वात पेरमिली परिसरातील हजारोच्या संख्येने असलेल्या नागरिकांनी घटनेचा निषेध करत गावातील संपुर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवुन रैली काढली. यावेळी माजी सरपंच प्रमोद आत्राम, साजन गावडे, वासुदेव कोडापे, संजय सडमेक, शंकर गावडे, विनोद आत्राम, कविश्वर चंदनखेडे, संतोष मेश्राम, डा. गणेश मडावी, श्रीनिवास बंडमवार, आँसिफ पठाण, श्रीकांत दुर्गे आदि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.