“उद्या आलापल्ली बंदची हाक; आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आदिवासी सामाजीक सघंटना मोर्चा काढणार”
1 min readअहेरी, अन्वर शेख; (तालुका प्रतिनिधी): १६जून : १० जुन रोजी आलापल्ली येथे एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवरती आलापल्ली येथील दोन युवकांनी अत्याचार केले. या घटनेचा निषेधार्थ व पीडित मुलीला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी सामाजीक सघंटनांनी उद्या १७ जून रोजी विर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथे निषेध मोर्चा काढण्याचे ठरवले आहे.
त्या आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी या मागणी करीता सर्व आलापल्ली अहेरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदविण्यात येणार आहे. सादर मोर्च्यात परिसरातील महिला, सामाजीक कार्यकर्ते , व्यापारी बाधंव, पत्रकार बधुं यानी १७/०६/२०२३ रोज शनिवार ला सकाळी ९ वाजता विर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथे पोहचून सहभागी व्हावे असे आव्हान वशिलकुमार मोकाशी यांनी केले आहे.