“अखेर त्या लोकांना दुर्गंधी पासून मुक्ती मिळणार; वस्तीलगत घनकचऱ्याची नगर पंचायत कडून उचल सुरू”

“कुरखेडा येथील आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आम सभेत गाजला होता कचऱ्याचा मुद्दा”
कुरखेडा; (प्रतिनिधी); २१जून: कुरखेडा येथील नगर पंचायत कडून गावातील जमा होणारा घन कचरा येथील सती नदी किनारी पाणीपुरवठा विहिरी नजिक लोक वस्तीला लागून साठवून ठेवला होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सदर कचरा उचलून इतरत्र हलविणे बाबत अनेक निवेदन आंदोलन येथील वास्तव्यास असलेल्या लोकांच्या वतीने करण्यात आले होते. नुकत्याच पंचायत समिती येथील आम् सभे मध्ये सदर कचरा उचल करण्या संदर्भात मांडलेल्या विषयास येथील मुख्याधिकारी राजकुमार धानबाते यांनी येत्या ८ दिवसात सदर कचरा उचल केली जाईल अशी ग्वाही दिली होती.
पावसाळ्यापूर्वी सदर कचरा उचल करून नगर पंचायत कुरखेडा यांनी लोकांना दुर्गंधी पासून मुक्ती देत त्यांच्या आरोग्याला दिलासा दिलेला आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेले शब्द पडून सदर कचरा उचलण्याचे काम झाल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.