“रानटी हत्तींच्या कळपाचा आंबेझरी गावावर हल्ला; १४ घरांची मोडतोड करत अन्नधान्य केले फस्त;सुदैवाने जिवीत हानी नाही”
1 min readकूरखेडा,(प्रतिनिधी);२ ऑगस्ट: तालूक्यात मागील काही दिवसापासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान अचानक आंबेझरी गावावर हल्ला चढवत येथील १४ घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत घरातील अन्न धान्य जिवनाआवश्यक वस्तू सह साहित्याचीही मोडतोड केली. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी, ऐन पावसाळ्यात या कूटूंबावर आभाळ कोसळत त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पूराडा बालाजी दिघोडे यानी नूकसानीचा पंचनामा करीत नूकसान भरपाई अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. आंधळी(सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कूटूंब असलेला आंबेझरी डोगंर व घनदाट जंगलाने वेढलेला हा १०० टक्के आदिवासी कूटूंब असलेला छोटासा गाव. गावकरी निसर्गाच्या सानिध्यात भात शेती व वन उपजावर आपला उदर निर्वाह करतात. काल रात्री ९ वाजेचा सूमारास अचानक संकट कोसळले. १८ ते २० चा संख्येत असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने गावावर हल्ला चढवला व घरांची नासधूस करण्यास सूरवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने भांबावून व घाबरलेल्या गावकऱ्यांनी मूल बाळा सह घरातून पळ काढला. काही वेळानंतर स्वताला सावरत व बळ एकवटत गावकऱ्यांनी काळ्या व ठेंभे पेटवत हत्तीचा कळपाला पीटाळून लावण्याचा प्रयत्न सूरू केला. मात्र आज पहाटे पर्यंत त्यांचा धूमाकूळ सूरूच होता.
सूदैवाने यावेळी कोणतीच जिवीतहानी झाली नाही. मात्र घराची व घरातील साहीत्याची मोठी मोडतोड व घरातील अन्न धान्याची मोठी नासाडी केली. त्यामूळे येथील गरीब कूटूंब निराधार झाले आहे. दूर्गम भागातील आदिवासी गरीब कूटूंब पावसाळ्यात ४ ते ६ महिण्याचा अन्न धान्याचा साठा करून ठेवतात. मात्र या हल्ल्यात त्यांचा हा साठाच नष्ट झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडत मोठे संकट निर्माण झाले आहे. या शिवाय गावातील केळीचे झाडे तसेच गावालगत असलेल्या धान पीके ही पायदळी तूडवत मोठे नूकसान केले आहे. या हल्ल्यात आंबेझरी येथील आनंदराव हलामी,बारीकराव मडावी, आसाराम मडावी,भाऊदास मडावी,तूकाराम मडावी,सखाराम मडावी,चून्नीलाल बूद्धे,दिलीप मडावी,लालाजी मडावी,धर्मराव हलामी,शामराव काटेंगे, यशवंत हलामी,रैसू हलामी,मंगरू हलामी यांचा घराची मोठी नासधूस झालेली आहे. शासन यांचा परीस्थीची विचार करीत तात्काळ याना निवारा व अन्न धान्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरीकानी केली आहे.
“आंबेझरी घटनेची माहीती मीळताच आज सकाळी पूराडा वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यानी घटणास्थळावर पोहचत नूकसानीचा पंचनामा केला. यावेळी नूकसानग्रस्ताना शासन निकषाप्रमाणे ५ हजारा पर्यंत आर्थिक मदत देता येते. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यानी पीडित गावकऱ्यांना दिली आहे. ५ हजाराची मदत नूकसानीचा तूलनेत तोकडी असल्याने नूकसानी प्रमाणेच नूकसान ग्रस्ताना मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.”