“न्यूज 18 लोकमतचे पत्रकार महेश तिवारी यांना पिंपरी चिंचवड ( पुणे) एडीटर्स गिल्ड तर्फे विशेष पुरस्कार देवून सन्मान”; मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे हस्ते गौरविण्यात आले
1 min readगडचिरोली; (प्रतिनिधी); २० ऑगस्ट: गेली तीस वर्ष गडचिरोली सारख्या माओवादप्रभावीत जिल्ह्यात पञकारिता करणा-या न्यूज 18 लोकमतचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महेश भाऊ तिवारी यांना पिंपरी चिंचवड ( पुणे) एडीटर्स गिल्ड तर्फे विशेष पुरस्कार देऊन पिंपरी चिंचवड येथे महारष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा हस्ते पुरस्कार गौरविण्यात आले आहे.
लोकसत्ता पासुन पत्रकारितेची सुरुवात करुन ईटीवी नंतर न्युज 18 लोकमत आणि महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून महेश भाऊ हे गेली तीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असुन छत्तीसगड सारख्या भागातही जाऊन अतिशय जोखमीची पत्रकारिता करणाऱ्या महेश भाऊ तिवारी यांना आज सन्मानित करण्यात आले.
महेश तीवारी यांना मिळालेल्या पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्या आणि सिरोंचा तालुक्याच नाव लवकिक केला असून सर्वस्तरातून त्यांचे कौतुक केलं जात आहे. गडचिरोली न्यूज नेटवर्क तर्फे ही भाऊंना खूप खूप अभिनंदन 💐💐💐