December 22, 2024

“सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या :कस्तुरी महिला भिसी गृप भगिणींचा उपक्रम”

1 min read

आरमोरी : आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिवस रात्र तैनात असलेले सैनिक त्यांच्या कुटुंबियांसोबत कोणतेच सण साजरे करु शकत नाहीत. पुढील महिन्यात येणाऱ्या बहीण- भाऊ यांचया पवित्र नात्यातील “रक्षाबंधन” या सणालाही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही, अशा अनेक सैनिक भावांसाठी” एक राखी सैनिकांसाठी ‘ ही संकल्पना मनात रुजवून कस्तुरी महिला भिसी गृपने आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होता येत नाही. परंतु, सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी कस्तुरी महिला भिसी गृप यंदाही भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या जवानांना राख्या पाठवले आहेत.

आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या, दिवस रात्र देशाच्या रक्षणासाठी उभे असतात, आपले जवान आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात होते.खर तर ते आहेत म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. शांत झोप घेऊ शकतो. म्हणजे आपले खरे रक्षणकर्ते आपले सैनिक भाऊच आहेत म्हणून एक राखी सैनिकांना ही कल्पना सुचली आणि त्या संकल्पनेचा कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि आपण घरीच राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठवूया का अस विचारले असता सर्वजण तयार झाले . राखी म्हणजे केवळ धागा नाही तर त्या धाग्यात शाही भने गोने की आरमोरी येथील कस्तुरी महिला भिसी गृप द्वारा सालाबादा प्रमाणे यावर्षीही भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ रक्षाबंधनानिमीत्य राख्या पाठविल्या..संपुर्ण देशवायीय एकीकडे पारंपारिकरित्या घरोघरी मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करतो.पण खरे राखी सणाचे मानकरी आहेत, ते आपल्या भारतीय सीमेवर लढणारे वीर बहादूर सैनिक. आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्री सीमेवर पहारा देत देशाचे व पर्यायाने आपले रक्षण करित असतात.वास्तविक रक्षाबंधन हे नावच संरक्षणाचे बंधन आहे, हे हेरुन या पवित्र सणाची आठवण म्हणून येथील कस्तुरी भिसी महिला गृप द्वारा,यावर्षीही सैनिक बांधवांना नुुकताच राख्या पोष्ट करण्यात आल्यात.याप्रंसगी साधना भोयर, रजनी किरणापुरे,रंजना गौतम, वंदना जुआरे,ममता धकाते,रिमा मने, प्रिती भोयर ,चन्द्रकला तिजारे ,बाबी खरवडे,वर्षा तिजारे,माधुरी ठवकर, सपना मने आदी उपस्थित होते .या गृपद्वारा स्वखर्चाने समाजकार्याशी निगडित विवीध उपक्रम व समाज सेवकांच्या कार्याचे गौरव व सन्मानार्थ खारीचा वाटा स्वरुपात मदत देऊन प्रोत्साहित करतात.

About The Author

error: Content is protected !!