“कुरखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची आढावा बैठक; राज्य कार्यकारणीत नवनियुक्त व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छांनी स्वागत”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी): १७ सप्टेंबर: कुरखेडा येथे व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची पहिली आढावा बैठक गडचिरोली जिल्हाध्यक्ष यांच्या नियोजनानुसार कुरखेडाच्या शासकीय विश्रामगृह मध्ये 17 सप्टेंबर 2023 ला घेण्यात आली. या आढावा बैठकीचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्येंकटेशजी दुडमवार तर राज्य कार्यवाहक संजयजी टिपाले, विदर्भ कार्याध्यक्ष सुमितजी पाकलवर, कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा संघटक विनोद नागपूरकर, जिल्हा सदस्य जयंतजी निमगडे व कुरखेडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
आढावा सभेची प्रस्ताविक कार्याध्यक्ष नासीर हाश्मी यांनी मांडली. वाईस ऑफ मीडियाच्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती यावेळेस उपस्थित पत्रकारांना देण्यात आली. व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची स्थापना झाल्यापासून संघटनेकडून पत्रकारांना विविध प्रकारची सोई सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहे अशी माहिती बैठकीत जिल्हाध्यक्ष व्यंकटेशजी दुडमवार यांनी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे कार्य, पत्रकारांचे अधिकार तसेच पत्रकारांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन व ओळखपत्र व येत्या 2 ऑक्टोंबर 2023 रोजी मुल येथे एक दिवसीय कार्यशाळा होत असून कार्यकारणीची उपस्थिती अनिवार्य असे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले.
व्हाईस ऑफ मीडिया राज्यकार्यकारणीमध्ये राज्य कार्यवाहक या पदावर संजयजी टिपाले यांची निवड झाल्याबद्दल कुरखेडा तालुका वाईस ऑफ मीडियातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. तसेच बैठकीत आलेल्या विदर्भ व जिल्हा पदाधिकारी या सर्वांचे तालुका कार्यकारणी कडून पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी कुरखेडा व्हॉइस ऑफ मीडिया संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांना संघटनेत समाविष्ट करण्याची तयारी दर्शविली.
सुधर आढावा बैठकीला रमेश बोरकर, सिराज पठाण, विजय भैसारे, विनोद नागपूरकर, रुपेंद्रसिंग सेंगर, चेतन गाहाने, ताहीर शेख, गीतेश जांभुळे, श्याम लांजेवार, कृष्णा चौधरी, सुरेंद्र सहारे, महेंद्र लाडे, शालिकराम जनबंधू, दीपक धारगाये, राकेश चौहान, विजय नाकाडे आदी पत्रकार उपस्थित होते.