“मेरी माटी मेरा देश या उपक्रम अंतर्गत : अमृत कलश यात्रा”

गडचिरोली,(प्रतिनिधी);२५ सप्टेंबर: स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात साजऱ्या होणाऱ्या मेरी माटी मेरा देश या उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील घरातून मुठ भर माती किंवा चिमुटभर तांदूळ अमृत कलश मध्ये जमा करण्यात येत आहेत. सदर सर्व अमृत कलश हे तालुक्यावर एकत्रित करून प्रत्येक तालुक्याचा एक प्रातिनिधिक अमृत कलश राज्य राजधानी मुंबई येथील २७ ऑक्टोबर २०२३ च्या कार्यक्रमात सामील होऊन नंतर केंद्र राजधानी दिल्ली येथे माननीय पंतप्रधान यांचे अध्यक्षतेत कर्तव्य पथवर होणाऱ्या २७ ते ३० ऑक्टोबर च्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सामील होऊन अमृतवाटिकेत समाविष्ट होणार आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली पंचायत समिती मार्फत नेल्या जाणाऱ्या अमृत कलशमध्ये कार्यक्रमातील हजर सर्व मान्यवर अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र शासन, धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्ण गजबे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अर्चना इंगोले यांनी मुठभर माती जमा करून गडचिरोली जिल्ह्याकरिता आपले योगदान नोंदविले.