“गडचिरोली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम”

गडचिरोली ,(प्रतिनिधी); २४ सप्टेंबर: नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम व इयत्ता दहावी बारावी मध्ये मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पूजन करून उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक विभागात मधून प्रत्येक पंचायत समिती निहाय एक याप्रमाणे ११ प्राथमिक शिक्षकांना व माध्यमिक विभागातून १ माध्यमिक शिक्षकाला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मंत्री महोदय यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले व सपत्नीक शाल, साडी चोळी, शिल्ड प्रदान करून सत्कार करण्यात आले
इयत्ता दहावी परीक्षा २०२३ मध्ये अनुक्रमे प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रुपये व इयत्ता बारावी कला, विज्ञान, वाणिज्य या प्रत्येक शाखेतून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रुपये पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ४ शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एम. पी. एस. सी. परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर अत्यंत महत्त्वाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगाटा चेक या शाळेची संपूर्ण रंगरंगोटी विनामूल्य करून सामाजिक संदेश रुजविणारे सामान्य नागरिक यांचाही याप्रसंगी मंत्री महोदयांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद गडचिरोली द्वारा सत्कार करण्यात आले.