“महा-रेशीम अभियान-2024 चा अतिरिक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे शुभहस्ते शुभारंभ”
1 min readगडचिरोली,(जिमाका) दि.21: रेशीम उद्योगास प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच राज्य सरकार कडुन राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती गावपातळीवर शेतक-यांपर्यंत पोहचविण्या करिता जिल्हा रेशीम कार्यालय तर्फे तयार करण्यात आलेल्या रेशीम चित्ररथाचे दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली, धनाजी पाटील यांचे शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी जि.गडचिरोली येथील रेशीम विकास अधिकारी, ए.व्ही. वासनिक, वरिष्ठ तांत्रिक सहायक, जी.आर.उईके, क्षेत्र सहायक सी.व्ही.विठ्ठले, प्रयोगशाळा परीचर एस.पी.वाढोनकर, सारथी एस.व्ही.रामटेके इत्यादी उपस्थित होते.
राज्य शासनाचे वस्त्रोद्योग विभाग तसेच रेशीम संचालनालय, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यात महारेशीम अभियान -2024 राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत रेशीम उद्योग करु इच्छीना-या शेतक-यांनी 20 नोव्हेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. टसर रेशीम शेतकऱ्यांना नोंदणी निशुल्क आहे. व तुती पात्र शेतक-यांना 1.00 एकर तुती लागवडी करीता 500 रुपये नोंदणी शुल्क भरुन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतक-यांच्या मागणी नुसार स्वत:च्या शेतीवर किटक संगोपनाचे कामकाज करुन रेशीम शेतीच्या माध्यमातुन उत्पादीत कोषापासुन होणारे उत्पन्न त्या लाभार्थीस लाभ मीळवून देईल. रेशीम शेती मध्ये वर्षाकाठी निव्वळ नफा 1.5 ते 2 लक्ष मिळु शकते असे जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी जि.गडचिरोली येथील रेशीम विकास अधिकारी, ए.व्ही. वासनिक यांनी सांगीतले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांनी रेशीम उद्योग हा खरोखरच आर्थीक लाभ मिळवुन देणारा उद्योग असून पारंपारीक पीकाला एक उत्कृष्ठ जोडधंदा ठरतो आहे. शास्त्रोक्त पध्दतीने रेशीम शेती केली तर मोठया प्रमाणावर फायदयाची ठरणार आहे असे सांगीतले. या महारेशीम अभियान 2024 अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या रेशीम शेतीकडे वळणेसाठी नाव नोंदणी करावी व शासनाचे योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन महारेशीम अभियानास शुभेच्छा दिल्या.
अधिक माहिती साठी संपर्क साधावा- जिल्हा रेशीम कार्यालय,आरमोरी,वडसा रोड, आरमोरी जि.गडचिरोली पिन-४४१२०८.