“गैरहजर ग्रामसचिवामूळे कामे खोळबंली, संतप्त गावकऱ्यांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कूलूप”
1 min readकूरखेडा;(प्रतिनिधी); २३ नोव्हेंबर: मागील एक महिण्यापासून कर्तव्यावर गैरहजर असलेल्या आंधळी(नवरगांव) येथील ग्राम सचिवामूळे गावातील अनेक विकास कामे तसेच वैयक्तिक कामे खोळबंल्याने संतप्त गावकऱ्यानी आज ग्रामपंचायत कार्यालयाला कूलूप ठोकत आपला रोष प्रकट केला.
संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील याना आज दि २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात गावकऱ्यानी आरोप केला आहे की येथील ग्रामसचिव श्रद्धा रामटेके या मागील एक महिण्यापासून कार्यालयात अनियमित येत असल्याने विकास कामे तसेच वैयक्तिक कामे प्रभावित होत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक ठिकानचे विद्यूत देयके थकले असल्याने जि. प. शाळेची विद्यूत पूरवठा तसेच गावातील पथदिव्यांचा विद्यूत पूरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामूळे एन दिवाळीत गावात अंधार पसरलेला होता. आज महत्वाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वनदाव्यांचे सीमांकन व शिवारफेरी करीता गडचिरोली येथून चमू आलेली आहे. मात्र यावेळी ग्रामसचिव गैरहजर असल्याने गावकरी संतप्त झाले व त्यानी ग्रामपंचायत कार्यालयाला कूलूप ठोकत आपला निषेध व्यक्त केला. याबाबद पंचायत समिति कूरखेडा येथील विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर भोगे याना विचारणा करण्यात आली यावेळी त्यानी ग्रामसचिव आज गूरूवार रोजी कार्यालयीन कामाने पंचायत समिति येथे होते. यावेळी गावकर्यानी कार्यालयाला कूलूप ठोकला आहे. अशी माहिती मीळताच त्याना लगेच ग्रामपंचायत कार्यालय कडे रवाना करीत गावकर्याचा अडचणी समजून घेत उदभवलेला प्रसंग समोपचाराने मार्गी लावण्याची सूचणा करण्यात आली आहे.
सदर प्रकरणा संदर्भात येथील ग्रामसेविका यांनी आपली बाजू मांडत सांगितले आहे की ते नियमित स्वरूपात ग्रामपंचायत आंधळी येथे सेवा देत आहे. मागील एका महिन्यापासून त्यांना काही पारिवारिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या कारणांमुळे अर्जित रजेचा निवेदन वरिष्ठाकडे सादर केलेला होता. आईच्या अकाली निधनामुळे मी मला मानसिक आघात झाल्याने आरोग्याचा त्रास झाला आहे. माझ्या बद्दल लोकांचा काही गैरसमज झाला असेल. आपण लोकांशी याबाबत चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी बोलून दाखवले.