“३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू किंवा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच”- अरुण केदार
1 min read“स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी छत्तीसगड बॉर्डर बोटेकसा ला विराआस चे रस्ता रोको आंदोलन”
कोर्ची; १४ डिसेंबर: विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता व निर्णायक लढयाकरीता व संसदेच्या २ जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने व संसदेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची घोषणा करावी. या कारीता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता सातत्याने आंदोलनाचा रेटा लावणारा दबाव गट म्हणून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा याकरीता आज दि. १४.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील बोटेकसा येथे सकाळी ११ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन” करण्यात आले. रस्ता रोको आंदोलन तीन तास चालले या दरम्यान शेकडो ट्रक चालकांची तारांबळ उळाली. आंदोलन कर्त्यांनी आक्रमक नारे लावले. यावेळी “वेगळा विदर्भ झालाच पाहिजे”, “लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे”, “अभी तो यह अंगडाई हैं आगे घोर लढाई हैं”, “लढेंगे-जितेंगे”, “कटेंगे मगर हटेंगे नही”, “लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ”, जय विदर्भ- जय जय विदर्भ अश्या घोषणा देण्यात आल्या.
आंदोलन स्थळी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, बोटेकसा ते कोरची हायवे रस्ता व कोरची तालुक्यातील इतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, बोटेकसा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती, बिहिटेकला गटग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेच्या कामाला गती, सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभानां गौण वनउपज व गौण खनिज टी. पी देण्याचा अधिकार देण्यात यावा, मालकीच्या शेत जमिनीत व गावठानातील मालकी जमिनीच्या जागेवर असलेल्या झाडांची कापणी करण्याची मंजुरी वन विभागाने सरसकट द्यावी, घरकुल मंजूर लाभार्थीयांना घरकुल बांधण्याकरिता किमान पांच ब्रास रेती बिना रॉयल्टी आणण्याची मुभा देण्यात यावी, ध्यान साठवणूक गोडाऊन, बेरोजगारांना पांच हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजने करिता लाभ घेणाऱ्या लाभार्थीयांना उत्पन्न मर्यादा २१ हजार वरून किमान पन्नास हजार करण्यात यावी. व इतर मागण्याचे निवेदन स्वीकार करण्या करता नायब तहसीलदार सोनवणे साहेब आले व त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या मागणी वाचून संबंधित विभागाला पाठविण्याचे मान्य केले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात २७.१२.२०२३ ला दुपारी १२ वाजता पासून “आमरण उपोषण” संविधान चौक नागपूर ला केले जाणार आहे.
रस्ता रोको आंदोलनाला विराआंसचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिंग ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे पाटील, नागपूर जिल्हा युवा टायगर फोर्स अध्यक्ष पराग वैरागडे, कोअर कमेटी सदस्य शालिक पाटील नाकाडे, कोरची तालुका अध्यक्ष किशोर नरोटे, कुरखेडा तालुका अध्यक्ष रामचंद्र रोकडे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सोशल मीडिया अध्यक्ष हेमंत कुमार मरकाम, श्यामलाल गावडे, गणेश गावडे, महेश नरोटे शंकर जेठूमल, सदाराम कुमरे, मनराखण सोरसाठी, उषाबाई कुमरे, भारत सागर, रामाधर सिरसाठी, हरिश्चंद्र गंगबोईर, भगवान अडबय्या, गिरीश अडबय्या, मारगेसाई कल्लो, मानोराम कुमरे, सेवाराम ठेला, शोभीत सोंजवाल, शीतल कल्लो, भुरसे बाई होळी, शिलोबाई दूधकवर उपस्थित होते.