“वैद्यकीय तपासणी दरम्यान पोलिसांना चाकमा देत, गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार”
1 min readकुरखेडा; १९ डिसेंबर: येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता आणलेला आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाल्याची घटना घडली असून परिसरात मोठ्याप्रमाणात शोधमोहीम राबविली असता आरोपी मिळाला नसल्याची बातमी आहे.
कुरखेडा येथे दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणातील आरोपी प्रेनल खेमचंद कराडे वय 22 वर्षे रा. चन्ना भाकती ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया याला अटक करून वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्य संबंधी अभिप्राय मिळविणे करिता येथील उपजिल्हा रुग्णालयात पोलीस वाहनाने घेवून पोलीस आले होते. तपासणी दरम्यान आरोपीने मळ मळ वाटत असल्याचा सांगत रुग्णालयातील खिडकी जवळ जाऊन उल्टी करण्याच्या बहाण्याने थेट रुग्णालया बाहेर उडी घेत धूम ठोकली. पोलिसांना समजेल त्या पूर्वीच तो आरोपी नजरे आड झाला. आरोपीने पळ काढला हे लक्ष्यात येताच शोधाशोध सुरू झाली. दुपार पासून सुरू असलेली शोध मोहीम रात्रभर सुरू असल्याची माहिती आहे.
“समजमध्यामावर आरोपीने फोटो टाकून माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन”
दरम्यान आरोपी शोधा – शोध करून थकलेल्या पोलीस यंत्रणेने समाजमध्यामावर आरोपी फोटो सह आरोपी फरार बाबत माहिती प्रसिद्ध केली
“376 मधला आरोपी मेडिकल करतांना पडून गेलेला आहे आता 1 तास अगोदर कुणालाही दिसला किंवा मिळाला तर लगेच police station kurkheda येथे कळवा.”
सदर मेसेज परिसरात कमालीचा व्हायरल झाला. येथील लगतच्या कुंभिटोला परिसरातून सादर आरोपी गेल्याची खात्री लायक माहिती पोलिसांना मिळताच मोठ्या संख्येने पोलीस या भागात सक्रिया झाले होते. येथील आरोपीच्या संपर्कातील काही लोकांना तपासा करिता उशिरा पर्यंत पोलीस ठाणे कुरखेडा येथे बोलावून माहिती मिळविण्याचा ही प्रयत्न झाला. परंतु आरोपी पोलिसांना गवसला नसल्याची माहिती आहे.
गंभीर प्रकरणातील आरोपी पडून गेल्याने एकंदरीत येथील पोलिसांच्या कार्यशैली वर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रकरणात विभागाने कोणती कार्यवाही केली हे समजू शकले नाही.