“अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला फरार आरोपी; वैद्यकीय तपासणी दरम्यान झाला होता फरार “
1 min read“मुख्य आरोपी सह दोन अन्य सह आरोपींना ही पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश; कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले आरोपी”
कुरखेडा; १९ डिसेंबर: येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता आणलेला आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने मोठ्या शिताफीने सदर आरोपी सह अन्य दोन आरोपींना पकडून कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
कुरखेडा येथे दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणातील आरोपी प्रेनल खेमचंद कराडे वय 22 वर्षे रा. चन्ना भाकती ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया याला अटक करून वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्य संबंधी अभिप्राय मिळविणे करिता येथील उपजिल्हा रुग्णालयात पोलीस वाहनाने घेवून पोलीस आले होते. तपासणी दरम्यान आरोपीने मळ मळ वाटत असल्याचा सांगत रुग्णालयातील खिडकी जवळ जाऊन उल्टी करण्याच्या बहाण्याने थेट रुग्णालया बाहेर उडी घेत धूम ठोकली होती. पोलिसांना समजेल त्या पूर्वीच तो आरोपी नजरे आड झाला. आरोपीने पळ काढला हे लक्ष्यात येताच शोधाशोध सुरू झाली. दुपार पासून सुरू असलेली शोध मोहीम रात्रभर सुरू होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी पडून देण्याबाबत
समजमध्यामावर पोलिसांचे आवाहन सुद्धा व्हायरल झाले होते.
सदर मेसेज परिसरात कमालीचा व्हायरल झाला. येथील लगतच्या कुंभिटोला परिसरातून सादर आरोपी गेल्याची खात्री लायक माहिती पोलिसांना मिळताच मोठ्या संख्येने पोलीस या भागात सक्रिया झाले होते. येथील आरोपीच्या संपर्कातील काही लोकांना तपासा करिता उशिरा पर्यंत पोलीस ठाणे कुरखेडा येथे बोलावून माहिती मिळविण्याचा ही प्रयत्न झाला. परंतु आरोपी पोलिसांना गवसला नाही.
गंभीर प्रकरणातील आरोपी पडून गेल्याने एकंदरीत येथील पोलिसांच्या कार्यशैली वर प्रश्न निर्माण झाला होता. अश्यातच जिल्हा पोलिस यंत्रणेने प्रकरणाची सूत्रे हाती घेत जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पथक गठित करून कुरखेडा परिसरात शोध मोहीम राबविली असता आरोपी पाहटे दरम्यान आपल्या आई समवेत गावा कडे पायी जाताना आढळला. त्याला ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेने प्रकरणातील इतर दोन फरार आरोपींना सुध्दा ताब्यात घेतले.
सकाळी ताब्यात घटलेले आरोपी कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे. आरोपी मिळताच एकंदरीत पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.
आरोपींना शोध घेत अटक करून घेण्यात सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड, हेड कॉन्स्टेबल, अकबर पोयम, दिपक महिला पोलिस उपनिरीक्षक आसावरी शेंडगे, पोलीस स्टेशन, कोरची सह स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने विशेष प्रयास केले.
सदर प्रकरणात ज्यांच्या निष्काळजीने आरोपी फरार झाला त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस विभागाने कोणती कार्यवाही केली हे समजू शकले नाही.