December 23, 2024

हायवे च्या नावाने कुरखेडा येथे थट्टा; हातावर कमावून खाणाऱ्या गरिबांचे दुकानं हटविली, बड्या लोकांचे अतिक्रमण वाचविण्यासाठी महामार्ग रस्ताच अरुंद केल्याचा आरोप”,

1 min read

कुरखेडा; २२ जानेवारी: कुरखेडा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे ५४३ चे काम सध्या प्रगती पथावर आहे. बड्या लोकांचे अतिक्रमित पक्के बांधकाम तुटू नये म्हणून येथील नेते मंडळी कामाला लागली होती. अखेर गरिबांच्या रोजगारावर बुलडोझर चालवून बड्या लोकांना वाचविण्यासाठी येथील महामार्ग रस्ताच अरुंद करून बांधकाम होत असल्याचा आरोप होत आहे.

कुरखेडा शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नियोजित झाल्यानंतर येथील बाजारपेठेत महामार्ग निर्माण विभागाकडून मोजमाप करून मोठ्याप्रमाणात पक्की बांधकाम असलेली दुकानं तोडली जातील अशी सिमांकन केल्यागेली. मार्गात येणाऱ्या रस्त्यालगत कच्च्या दुकानं चालविणाऱ्या टपरी धारकांनी इतरत्र व्यवसाय करण्याची सोय केली. नुकसान होवू नये म्हणून स्वतःच आपली साहित्य काढून घेतली. मोठे लोकांचे दुकानं तुटणार तर आमची कोण गय करणार अशीच भावना या लोकांची होती. मात्र आता बड्या लोकांना वाचविण्यासाठी रस्ताच अरुंद केल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मार्किंग केलेल्या चिन्ह पासून १ ते २ मीटर रस्त्याची रुंदी कमी करून पूर्वी असलेल्या रस्त्या एवढीच रुंदी ठेवत पूर्वी असलेली नाली तोडून बांधकाम सुरू केला आहे. रस्ता पूर्वी होता तेवढाच अरुंद ठेवायचा होता तर महामार्गाचा साँग करून गरीब लोकाचे रोजगार हिरवण्याचा काय उद्देश? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाढती लोकसंख्या व भविष्याचे दृष्टीने वाढणारी वाहनांची संख्या, वाहतुकीस होणारी कोंडी दूर व्हावी म्हणून लहान रस्त्यांचे रुंदीकरण करून मार्ग मोठे केले जातात. कित्येक ठिकाणी महामार्ग बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवून जागेची मालकी सिद्ध करणाऱ्यांना मोबदला ही देण्यात आले आहे. परंतु कुरखेडा येथे मोजक्या बड्या लोकांचे बांधकाम तुटू नये म्हणून महामार्गाचा हा रस्ताच अरुंद करून घेतला आहे. जर राजकीय दबाव रस्ता अरुंद करता येत असेल तर इतर ठिकाणी महामार्ग निर्मितीचे नियम वेगळे कसे?
बांधकाम पूर्वी कुरखेडा येथे मोजमाप करून मार्किंग केली होती ती नियम बाह्य होती का? की आत्ता जो बांध काम सुरू आहे तो नियम बाह्य आहे? असे एक ना अनेक प्रश्न येथे निर्माण होत असलेल्या महामार्गावरून उपस्थित केले जात आहेत.

“या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेण्या करीता सदर प्रतिनिधीने राष्ट्रीय महामार्ग चे विवेक मिश्रा यांना संपर्क केला असता त्यांनी येथील सेक्शन इंजिनिअर श्री. खापरे यांचेशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. श्री. खपारे यांना सदर बांधकामांबाबत होत असलेल्या अरोपाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  त्यामुळे महामार्ग विभागाची या बाबत काय म्हणणे आहे हे कळू शकले नाही.”

About The Author

error: Content is protected !!