“कुरखेडा मुख्यालयातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मुक्ती मिळणार?; उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी दिले रस्त्यावर वाहन थांबविण्यास प्रतिबंध घालण्याचे पोलीस विभागाला निर्देश”
1 min readकुरखेडा; २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांच्या दालनात झालेल्या औपचारिक चर्चेदरम्यान कुरखेडा मुख्यालयातील वाहतुकी व मुख्य रस्त्यावर उभे असणाऱ्या वाहन संदर्भात विषय मांडल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथं उपस्थित असलेल्या पोलीस विभाग व नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ रस्त्यावरील अतिक्रमण व शासकीय व खाजगी वाहन नवीन बस थांब्याच्या ठिकाणी च ठेवण्याची निर्देशित दिले.
दरवर्षी तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील प्रतिष्ठित व जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची औपचारिक चर्चा उपस्थित अधिकाऱ्यांच्या समक्ष होत असते. स्थानिक नागरिकांच्या कित्येक प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ही चर्चा फायदेशीर ठरते. या चर्चेदरम्यान येथील राजकीय पुढार्यांसोबतच स्थानिक पत्रकारही उपस्थित असतात. दरम्यान वेगवेगळ्या विषयावर होणाऱ्या या औपचारिक चर्चेवर तात्काळ निर्देश व सूचना संबंधित विभागाच्या जबाबदार प्रशासनिक अधिकाराला देण्यात येतात. यातच २६ जानेवारी २०२४ रोजी ध्वजा नवरा नंतर झालेल्या या चर्चेत अनेक विषयांना न्याय मिळाल्याची चर्चा सध्या गावात आहे. परंतु पोलीस विभागांना दिलेल्या सूचनेनंतर अजून पर्यंत कुरखेडा मुख्यालयातील वाहनांची सोय झाली नसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाचा काम सुरू असताना होणारी वाहनांची रेल असेल व त्यातच रस्त्यावर उभे असलेली वाहन ही मोठ्या दुर्घटनेस निमंत्रण देत असतात. उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांच्या सूचनेनुसार जर तात्काळ कारवाई झाली नाही तर यदाकदाचित या वाहतूक अवस्थेमुळे मोठे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.