“सत्ता-स्वार्थासाठी भाजपासोबत युती करणारी काँग्रेस – शिवसेना (उबाठा) आता कुरखेडा येथे कोणत्या तोंडाने मतदारांना मते मागणार?”

कुरखेडा; नसीर हाशमी; ४ एप्रिल: १८ व्या लोकसभेची निवडणुकीचा पहिला टप्प्याचा मतदान येत्या १९ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. एकी कडे प्रशासनिक यंत्रणा निवडणूक शांततेत पार पाडावी म्हणून अहोरात्र कामाला लागले आहे. त्यातच राजकीय पक्षांची ही मोर्चे बांधणी मोठ्याप्रमाणात सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत मध्ये एकमेकांविरुध निवडणुका लढून सत्तेच्या सुखासाठी मतदारांचे मतांचा सन्मान न राखता स्वार्थ व अर्थ कारणासाठी अभद्र युती करून लाभ मिळवीत असलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आता लोकसभा निवडणुकीत सत्ता मित्र झालेल्या आपल्या लाभार्थी पक्ष विरोधात मतदारांना कोणत्या तोंडाने समोर जातील असा प्रश्न कुरखेडा मुख्यालयात नगरपंचायत येथे तडजोड करून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता सुख घेणाऱ्या बाबतीत उपस्थित केला जात आहे.
कुरखेडा तालुक्यात राजकीय दृष्टीने केंद्र स्थान मानले जाणारे कुरखेडा मुख्यालय येथे सध्या कोणत्या एका नेत्याचा प्रभाव व वर्चस्व सध्या तरी दिसत नाही. केंद्रात सत्ता वापसी करिता भाजपने दिलेलं “अबकी बार ४०० पार” चा नारा व त्या उद्देशाला मूर्तरूप देणे करिता मागील वर्ष भरापासून भाजप व मातृ संघटनेने सुरू ठेवलेली पक्ष संघटन मजबुतीकरण व बूथ स्तरावरील मजबूत बांधणी एकी कडे भाजप पक्षाला मजबुती देते तर दुसरी कडे काँग्रेस व इंडिया गठबंधन मध्ये मोठ्या प्रमाणत घटक पक्ष समाविष्ट असले तरी त्यांची संघटनात्मक बांधणी व बूथ स्तर पर्यंतची मोर्चे बांधणी सध्या तरी पाहिजे तशी मजबूत असल्याचे निदर्शनास येत नाही.
या निर्णायक निवडणुकी मध्ये विरोधक म्हणून ज्या प्रभावी पद्धतीने १० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या भाजपचे अपयश व लोकविरोधी निती लोकांपर्यंत पोहचविणे अपेक्षित आहे. त्या पेक्षा भाजप सत्ता सुख प्राप्त करून ही परत सत्तेत येण्या करिता ७० वर्षाचा पाढा लोकांच्या डोक्यात शिरकाव करून घेण्यात सफल झाल्याची चित्र आहेत.