बसच्या धडकेत वृद्ध महिला ठार
1 min readचामोर्शी, २८ जून : तालुक्यातील वालसरा येथील बसथांब्यावर वयोवृध्द पती- पत्नी बसमधून उतरले. गर्दीतून पतीने वाट काढली. पण, पतीमागे निघालेल्या पत्नीला बसने धडक दिली, यात ती जागीच ठार झाली. ही घटना २७ जून रोजी दुपारी तीन वाजता घडली.
सावित्राबाई केशव दूधबळे (७४, रा. वालसरा, ता. चामोर्शी) असे मयत वृध्देचे नाव आहे. पती केशव यांच्यासमवेत सावित्राबाई या २६ जूनला निराधार अनुदान घेण्यासाठी चामोर्शी येथे आल्या होत्या. पती पत्नीने बँकेतून अनुदान काढल्यानंतर सामदा येथे लेकीकडे मुक्काम केला. केशव दुधबळे व पत्नी सावित्राबाई केशव दुधबळे (वय ७४) या दोघांनी २६ जून रोजी चामोर्शी बँकेतून निराधार योजनेचे मानधन घेऊन सामदा येथील लेकीकडे मुक्काम केला. २७ जूनला चामोर्शी येथे बाजारातून भाजीपाला खरेदी करून ते बसने (एमएच ०७ सी ९४०८) वालसरा येथे गेले. तेथे उतरल्यावर बसने वृध्देस चिरडले.