April 27, 2025

विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण

”जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन”

गडचिरोली, ०४ जुलै : दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्र तसेच ऑनलाईन न्यूज पोर्टल  शासनाच्या बातम्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करतो. तरी शासनाच्या अभियान, उपक्रमाच्या जाहीरातमधे साप्ताहिकांना डावलण्यात येते. म्हणून व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीने संपूर्ण देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले. व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत सणवार उत्सव काळात दैनिक, साप्ताहिक, न्युज पोर्टल, युट्युब चॅनलला जाहीरात देण्यात यावे. आरएनआय कडून नविन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या. २५ वर्ष पुर्ण झालेल्या साप्ताहिकास तपासणीतुन वगळण्यात यावे. टिआरपीची जिवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी. पत्रकाराकरीता अधिस्वीकृती कमिटी संदर्भामध्ये जुना जिआर रद्द करण्यात यावा. जे न्युज पोर्टल, युट्युब चॅनल, लोकाभिमुख अधिक लोकापर्यंत पोहचलेले आहेत त्यांना शासनाच्या यादिवर घेण्यात यावे. पत्रकारांची सेवानिवृत्ती योजनेमधे वाढ करण्यात यावे, अशा विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले.

उपोषणाला व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, राज्य सहसंघटक संजय तिपाले, राज्य कार्यकारणी सदस्य (साप्ताहिक विंग) मुकुंदभाई जोशी, विभागीय कार्याध्यक्ष सुमीत पाकलवार, रेखाताई वंजारी, संगीता विजयकर, बबन वडेट्टिवार, जेष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक, प्रा. मुनिश्वर बोरकर, नितिन ठाकरे, संदिप कांबळे, दिपक सुनतकर, अनुप मेश्राम, सुरेश पद्दशाली, रितेश वासनिक, मुकेश गेडाम, क्रिष्णा वाघाडे, जगदिश कन्नाके, हितेश ठेंगे आदी सहीत दैनिक, साप्ताहिक, न्युज पोर्टल, युट्युबचे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!