उद्योजकांकरिता १० जुलै रोजी ‘इग्नाइट महाराष्ट्र’ कार्यशाळा
1 min readगडचिरोली,दि.08(जिमाका): व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत IGNITE MAHARASHTRA -2024 (‘इग्नाइट महाराष्ट्र’) या कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी सकाळी 9.00 ते 2.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजकीय कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन स्वयंरोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृद्धीस चालना देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यशाळेचा जिल्ह्यातील उद्योजकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
तरी जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम, उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी व सहकारी संस्था आणि प्रक्रिया उत्पादक इत्यादींनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.